जीवनामध्ये समस्यांना एक दगड समजायचे आणि समाधानांना हातोडा, जर तुमच्याकडे एक समाधान असेल तर समस्यांचा दगड दोन तुकड्यात तुटेल, जे बाजूला सारायला अजून मेहनत लागेल. जर तुमच्या कडे अजून जास्त समाधान असेल त्यावेळेस तुमची ताकद आणि हातोड्याचे वजन वाढलेले असेल तेव्हा तुम्ही एक फटक्यात समस्यांच्या दगडाचे अनेक तुकडे करू शकाल, जे साफ करायला जास्त मेहनत नाही लागणार. आता फक्त विचार करा कि एक समस्याचे अगणित समाधान किंवा उत्तर असतील तेव्हा तो समस्यांचा दगड तुम्हाला अगदी छोटा वाटेल जो एका फटक्यात चुरा होवून तुम्ही फुक मारून आरामात उडवू शकता किंवा हवेचा एक झोका त्याला उडवून घेवून जाईल. सतत उत्तर किंवा समाधान शोधत राहा, एक वेळ अशी येईल कि तुमच्या कडे समस्या येणारच नाही.
- अश्विनीकुमार
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
0 आपले विचार