एकाने उत्तम प्रश्न विचारला "भावना म्हणजे काय?"


भावना म्हणजे आपले शरीर अवयव ज्या संपर्कासाठी भाषा वापरतात त्याला भावना असे म्हणतात. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी भूक, संकट आणि सेक्स हे उदाहरणार्थ घेवू. जेव्हा माणसाची उर्जा संपते तेव्हा सर्व आतील व बाहेरील अवयवांना उर्जेची गरज असते आणि ह्यासाठी भावनांचा एकमेकांशी संपर्कासाठी, संभाषणासाठी वापर केला जातो आणि उर्जेची गरज आपण जेवल्यानंतर भरून निघते. आणि हे आपल्याला तृप्त झाल्याची भावना निर्माण होते म्हणून समजते, न कि तुमचे प्रत्येक अवयव तुम्हाला सांगत बसते कि त्याच्या उर्जेची गरज पूर्ण झाली आहे आता खाणे थांबवा म्हणून.
आपले शरीर, अवयव सतत काम करत असतात, झोपेतसुद्धा. आपल्या शरीरात ७५ ट्रिलियन सेल आहेत, ते सतत एकमेकांशी संपर्क करत असतात. आता तुम्ही विचार करा जर ते आपण जे शब्द वापरतो त्याच्याने बोलायला लागले तर तुमचे काय होईल? सतत ती बड बड ऐकून तुम्हाला वेड लागण्याची पाळी येईल. ह्यासाठी निसर्गाने संपर्क करण्यासाठी भावनांची निर्मिती केली, जे ध्वनी पेक्षा जलद गतीने प्रवास करते.
उदाहरणार्थ तुमची अतिशय जवळची व्यक्ती जर हजारो किलोमीटर लांब जरी असेल आणि तुम्ही त्यांचाच विचार करत असाल तर त्यांचा फोन लगेच येईल ह्याला म्हणतात भावनिक संपर्क, टेलीपेथी. आणि आकर्षणाच्या सिद्धांताला फक्त भावनेची भाषा कळते, म्हणून काही जणांचे आयुष्य एका क्षणात बदलून जाते किंवा ते भाग्यवान असतात.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार