एका टीव्हीच्या वाहिनीवरील विनोदी कलाकाराची बातमी ऐकत होतो, त्याच्याकडून शासकीय कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचे प्रकरण होते, त्या बातमीदाराने एका सामान्य भारतीय नागरिकाचे घर दाखवले होते ज्याची भिंत हि त्यांनी ८० वर्षांपूर्वी बांधली होती ती मुंबई महानगर पालिकेने पाडली होती. ते सामान्य मराठी होते, त्यांचे घर हे त्यांनी बंगल्यात रुपांतरीत केले नव्हते आणि त्यांच्या घराला लागुनच एका प्रसिध्द गायकाचे घर होते, पाठीमागचे तर सोडाच पण पुढून आणि वरून त्यांनी अनधिकृत बांधकाम केले होते, आता पालिकेचे ते अधिकारी तर इतके आंधळे तर नसणार, बरोबर ना. मग त्यांना ती लागुनच असलेल्या बंगल्याची भिंत का नाही दिसली?
ज्यांना सरकारी कार्यालयांचा उत्तम अनुभव आहे, ज्यांना आपले शासन आणि न्यायव्यवस्था कशी चालते ह्याचा दांडगा अभ्यास आहे त्यांना समजेल कि पैश्यांच्या पट्ट्यांनी लोकांना कसे आंधळे करायचे ते. तपासून घेत जा, आपला परिसर फिरा, माहितीचा अधिकार वापरा, सामाजिक संघटना ज्या मिडिया मध्ये येत नाहीत किंवा भांडवलशाही मिडिया त्यांची दखल घेत नाही अश्यांकडून माहिती गोळा कराल मग तुम्हाला समजेल कि वास्तव मध्ये जग असे चालते, आणि जर ह्या जगात आपल्याला जगायचे असेल तर कसे जगायचे हे तुम्हाला शिकून घ्यावे लागेल.

अश्विनुकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार