उद्योजकामध्ये ज्वलंत इच्छाशक्ती असते. न तो कमेंट करत बसतो, नाही व्हास्टएप वर मेसेजेस करतो आणि केला तरी त्याला पत्ता विचारायचा असतो तेव्हा. तो किंवा ती फोन करतात, लवकरात लवकर आज किंवा उद्याची काहीही करून भेटण्याची वेळ घेतात, फी चे बोलले तरी ‘फी काहीही असू द्यात मी येतो’ असे बोलतात. ते जेव्हा आपल्या व्यवसायाबद्दल सांगत असतात तेव्हा त्यांच्यामधील आवड हि दिसून येते, समस्या कश्या सोडवत आहेत ह्यावरून त्यांचा धाडसीपना दिसून येतो. त्यांच्यामध्ये धीर धरायची क्षमता अफलातून असते. एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायला चालायची कृती करावी लागते तेव्हाच मनुष्य ध्येयापर्यंत पोहचतो. धाडसी मनुष्यच कृती करतो. जर तुमच्यामध्ये धाडसीपणा आहे तर तुम्ही उद्योग व्यवसाय सुरु करू शकता, जर नसेल तर उद्योग व्यवसाय नंतर सुरु करा, त्याअगोदर आत्मविकास करून घ्या. आजारपणात आरोग्यावर खर्च करण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी खर्च केलेला बरा.
आयुष्य तुमचे, निर्णय तुमचा, येणारा अनुभव पण तुमचाच आणि जबाबदार पण तुम्हीच.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार