मला एक अजून समजले नाही कि जस जसे विज्ञान पुढे जात आहे, नव नवीन संशोधन होत आहे, मग आजारांची संख्या कमी झाली पाहिजे, बरोबर कि नाही? मग असे का होत आहे कि आजारांची संख्या वाढतच चालली आहे, ज्यांना कधीच आजार नव्हते ते अचानक इन्फेक्शन ने ग्रस्त होत आहे, लहान मुलांना साधे आजार होण्यापेक्षा मोठ मोठे आजार होत आहेत, अचानक आजारपनावरील खर्च देखील किती तरी पटीने वाढला आहे, रुग्ण मरण्याची संख्यादेखील वाढली आहे. जो आरोग्याबद्दल आत्मविश्वास होता त्याची जागा आता वातावरण बदलल्यावर रोग होणारच ह्या विश्वासाने घेतली आहे, असे का घडत आहे? ह्याचे उत्तर सोपे आहे, कॉर्पोरेट कसे चालते, गुंतवणूकदार काय बघून पैसा गुंतवतात, जगभरातली मोठ मोठ्या फार्मा कंपनीच्या केसेस मिडिया मध्ये का नाही आल्यात ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तुमचे उत्तर भेटून जाईल.
अश्विनिकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार