जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’मध्ये जॉर्ज व्ही नेरियापाराम्बिल या भारतीय व्यावसायिकाचे तब्बल २२ फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे.
या भारतीय व्यावसायिकाने मेकॅनिक म्हणून सुरुवात केली होती. सध्या हा व्यावसायिक जीईओ नावाची कंपनी स्थापन करुन वातानुकूलन उद्योगात आपला जम बसवतो आहे.
“मी स्वप्न पाहणारा माणूस आहे, त्यामुळे मी स्वप्न पाहणे कधीही थांबवणार नाही. जर मला पटणाऱ्या किंमतीत अजून फ्लॅट मिळाले तर मी तेही विकत घेईन,” असं जॉर्ज व्ही नेरियापाराम्बिल यांनी सांगितले.
वयाच्या अकराव्या वर्षापासून वडिलांसोबत शेतमालाचा व्यापार करण्यासाठी जाणाऱ्या जॉर्ज यांना व्यावसायिक बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मॅकेनिक म्हणून दुबई गाठली. दुबईसारख्या देशात 'एसी'चा उद्योग चांगला चालेल हे जॉर्ज यांनी ७०च्या दशकातच हेरले.
१९७६ ला त्यांनी शारजा शहरात 'जीईओ' ही 'एसी'ची कंपनी सुरू केली आहे. मॅकेनिक ते एका कंपनीसह बुर्ज खलिफातील २२ फ्लॅटचा मालक हा त्यांचा प्रवास थक्क करणाराच आहे.
१९८४ मध्ये त्यांनी दुबईत आपली कंपनी स्थापन केली त्यानंतर प्रॉपर्टी डिलिंगच व्यवसाय देखील सुरु केला. दुबईत जो कोणी येतो तो श्रीमंत होतो हे मी कधीतरी ऐकले होते आणि श्रीमंत होण्याची हिच ओढ मला दुबईत घेऊन आली असेही ते सांगतात.
२०१० मध्ये या इमारातीचा भव्य उद्घटान सोहळा होता. हा सोहळा पाहण्यासाठी आपल्या एका मित्रासोबत जॉर्ज गेले होते. ही आलिशान, टोलजंग इमारत पाहून जॉर्ज खुपच थकित झाले. तेव्हा त्यांच्या मित्रांने या इमारतीत राहण्याची तुझी लायकी नाही असे सांगून त्यांची खिल्ली उडवली होती. मित्राची हिच गोष्ट त्यांना खूप लागली आणि त्यानंतर फक्त सहा वर्षांत लागोपाठ व्यवसायातून आलेल्या पैशांची बचत करून त्यांनी आलिशान फ्लॅट खरेदी केली.
कधीही कुणालाही त्याच्या किंवा तिच्या आजच्या परिस्थितीनुसार किंवा बघत असलेल्या स्वप्नांनवर अविश्वास दाखवू नका. काळ हा खूप बलवान आहे.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार