घफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा. तरुण तडफदार, इनामदार आणि काहीतरी मोठे करण्याची इच्छा असलेल्या गुजराती तरुणाची कथा. त्याच्या व्यवसायाची सुरवात, यश अपयश, उभारलेला व्यवसाय, लोकांच्या फायद्यासाठी अवलंबलेला एकच गैर मार्ग, स्वतःच्या फायद्यासाठी जुने जानते वरिष्ठ व्यवसायिकांची लोबी, विकत घेतलेला मिडिया, व्यवसायिक शत्रू असून जपले गेलेले हितसंबंध, १०० लोकांना आणि अब्जो रुपये वाचवण्यासाठी सतत दिला जाणारा एकाचा बळी. खुनाला आत्महत्या दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न, प्रस्थापित गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी केले जाणारे सरकारी कायदे, नियम व अटी, स्वतःच्या फायद्यासाठी अनेक वर्षे करत आलेले अब्जो रुपयांचे घोटाळे दाबून सामान्य लोकांच्या हितसंबंधांसाठी केलेला काही शे करोड रुपयांचा घोटाळा उघडकीस आणून तो घोटाळा करणार्याला सामान्य लोकांसमोर खलनायक म्हणून उभे करणे. हे काही मुद्दे.
फक्त एक गोष्ट लक्ष्यात ठेवा समुद्रात पोहताना कधीच शार्क माश्यासोबत शत्रुत्व नाही घ्यायचे.
काही करण्याअगोदर माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ता ह्याची झालेली हत्या व त्याच्या भावाने सांगितलेले भारतातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेचे सत्य हे एकदा युट्युब वर चेक करून घ्याल.

चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
0 आपले विचार