गुडगाव ची रहिवाशी उर्वशी दररोज गुडगाव च्या सेक्टर १४ मध्ये पिंपळाच्या झाडाखाली छोले भटुरेची हातगाडी लावते. ह्या पिंपळाच्या झाडाखाली एकूण खाद्यपदार्थाच्या १४ हातगाड्या लागतात, पण उर्वशीच्या छोले भटुरेच्या हातगाडीची खासियत आहे कि ती स्वस्तात चांगले साफ जेवण देते.
उर्वशीकडे ३ करोड किंमत असलेले घर आहे आणि एक स्कॉर्पियो सोबत २ SUV गाड्या आहेत, पण नवऱ्याच्या आजारपणामुळे कमाईचे मार्ग कमी झालेले दिसत होते. म्हणून उर्वशीने भविष्याची प्लॅनिंग केली आणि शिक्षिकेची नोकरी सोडून हातगाडीवर छोले आणि कुलचा विकायला सुरवात केली ज्यामुळे ती दररोज २५०० ते ३००० रुपये कमावते.
उर्वशी पुढे म्हणते कि "ठीक आहे कि आज माझ्याकडे महागड्या गाड्या, महागडे घर आणि पैसे आता आहेत पण जर मी आता काम समाधानकारक कमाईचे नाही सुरु केले तर हे सगळे संपून जाईल. मला नाही आवडणार कि पुढे जाऊन माझ्या मुलांना शाळा बदलावी लागेल. पैश्यांची समस्या पुढे न होण्यासाठी मी आज हे पॉल उचलले आहे."
माहितीनुसार उर्वशी BA पास आहे आणि लवकरच तीला स्वतःचे एक हॉटेल उघडायचे आहे. ह्या मध्ये एक समजले कि तिला पैसे कमावण्याच्या सोबत तिचे स्वप्न देखील पूर्ण करायचे आहे, म्हणून हा मार्ग निवडला आहे. सोबत उर्वशीची आर्थिक परिस्थिती पण चांगली नाही आहे म्हणून त्यांनी हार मार्ग निवडला.
तिला जेव्हा हाच व्यवसाय का निवडला असे विचारले असता तिने उत्तर दिले कि KFC चा मालक कोलोनेल सँडर्स च्या जीवनाचा खूप प्रभाव पडला आहे. कारण त्यांनी आल्या स्वप्नाची सुरवात हि वयाच्या ६५ वर्षी एक छोटासा उद्योग सुरु करून केली होती जे आज संपूर्ण जग ओळखते.
बोध : -
आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायला वयाची मर्यादा नसते. १० वर्षाखालील पण नवं उद्योजक आहेत आणि ६० वर्षांपुढील देखील नवउद्योजक आहेत.
परिस्थितीनुसार बदलत जा.
परिस्थिती तुमच्यावर हावी होते कि तुम्ही परिस्थितीवर?
जर परिस्थिती तुमच्यावर हावी होत असेल तर आजच संपर्क कराल.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार