दहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची पण जमिनींना भाव आल्या पासुन अचानक,शेठ,दादा,भाऊ,नाना,काका,मामा,सरकार,मालक पाटिल,राजे, आदी मंडळींचा लोंढा महाराष्ट्रात वाढला आहे. मोठमोठ्या शहरांच्या भोवताली असलेल्या गावांमधे नजर टाकली तर घरटी एकेक राजे आणि महाराज राहतात.बरं तुम्ही कुठल्या बुद्रुक वाडी वस्तीचे स्वयंघोषित पाटिल, राजे असाल पण प्रत्येक ठीकाणी ते शेपुट जोडलच पाहिजे का ? उदाहरणार्थ "गुलाबराव तिरसिंगराव झुंझुरके पाटील" अशी भारतीय रेल्वे पेक्षा मोठ मोठी नावं कशाला स्वतःला जोडून घ्यायची ? आपल्या लोकांना नुसता मोठेपणा करायला पाहिजे. हा मोठेपणा करण्याच्या नादात आपली नाकं गेली पण आपण शेंबुड जाऊ दिला नाही.
जगात सर्वात जास्त पैसा असलेला माणुस "बिल गेटस" एवढंच नाव सांगतो,त्याने कधी विल्यमराव हेन्रीचंद्रजी गेटस पाटील सांगितलेले ऐकले का?त्याच्या अंगावर सोन्याचे गोप बघितले का? भारतातील सर्वात श्रीमंत माणुस त्याची मुकेश अंबानी एवढीच ओळख आहे, त्याने कधी मुकेशराजे धीरूभाईशेठ अंबानी असं सांगितलं का? त्यांच्या पेक्षा जास्त पैसे आहेत का आपल्या कडे ? शरद पवारांच्या हाता पायात एक अंगठी बघितली का कुणी ? त्यांच्या पेक्षा जास्त पैसा आहे का आपल्या कडे?
आपल्या कडे थोडे पैसे आले कि ह्या मोठमोठ्या पदव्या , पांढरे स्टार्चचे कपडे , अंगावर सोन्याचं दुकान , मागेपुढे बाऊन्सर ........ आगआयाया भाऊची नुसती हवा बघुन घ्यावी.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
0 आपले विचार