राजकारण हे संपूर्णपणे भावनेवर चालते ना कि उद्योग व्यवसाय. कृपया ग्राहकांना परदेशी उत्पादन न घेण्याबाबत आवाहन करू नका, आपल्या उत्पादनांची तुलना, दर्जा व इतर सकारात्मक बाबी ह्यांची तुलना परदेशी कंपनीच्या उत्पादनाबाबत करत बसू नका. ग्राहक ह्याने आकर्षित होत नाही तर उलट तुमचा आत्मविश्वास कमी होत जाईल आणि ह्याचा परिणाम तुमच्या उद्योग, व्यवसायावर पडेल. मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, शांत मनाने परिस्थिती समजून घ्या, व्यापार संबंध वाढवा, त्यांच्या प्रत्येक कमजोरीचा फायदा उचला त्या अगोदर आपले उत्पादन परिपूर्ण करून घ्या. त्यांच्या 200 उत्पादनाच्या विरुद्ध तुमचे एक उत्पादन टिकू शकत नाही. त्यांच्या सारख्या विविध उत्पादनाचा समूह बनवा. मागणी पूरवठा आणि बदली उत्पादन ह्यांचे दीर्घ काळासाठी उत्तम ताळमेळ ठेवा. आपल्या उत्पादनाची जेवढी स्तुती करता येईल तेवढी करा. त्यांच्या कडे डॉलर आहे ज्याची किमंत 70 रुपये आहे ह्या विरुद्ध तुमच्याकडे प्रचंड एकाग्रता, इच्छाशक्ती, धाडस, नवीन ज्ञान आणि सर्वात महत्वाची गतीशील कृती पाहिजे.
अश्विनीकुमार
८0८0२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार