केफे कॉफी डे (CCD) मध्ये १ कप कॉफी ची किंमत १५० रुपये का असते?




केफे कॉफी डे कॉफी नाही विकत. कॉफी ला त्यांच्या व्यवसायात कमी महत्व आहे. ते मिटिंग ची जागा, वायफाय इंटरनेट, वातानुकूलित आणि आरामदायक जागा संभाषण करण्यासाठी विकतात. ह्या सगळ्यांचा खर्च म्हणून कॉफी ची किमंत ही १५० ते २०० घरात जाते.
असे समजून चला की केफे कॉफी डे महिन्याला १००० कप कॉफी विकते. एक कप कॉफी बनवायची किमंत ही भारतीय चलनात 50 रुपये होते असे समजू. गृहीत धरा की जागेचे भाडे हे १०,००० रुपये, २०,००० रुपये हे विजेचे आणि इंटरनेट चे बिल, आणि ४०,००० रुपये हे ३ कर्मचारी व १ व्यवस्थापक (मॅनेजर) ह्यांचा पगार.
त्यांना नफा पण कमवायचा हक्क आहे, आहे की नाही? असे समजा की ते २५ % नफ्यात खुश आहेत.
एकूण गुंतवणूक = १०,००० + २०,००० + ४०,००० + १०,००० X ५० (एक कप कॉफी ची किंमत) = १,२०,०००.
नफा = २५ % = ३०,०००
एकूण = १,५०,०००
त्यांना कॉफी पुढील किमतीमध्ये विकायची गरज आहे १,५०,००० / १००० = १५० रुपये.
हेच कारण आहे की तुम्हाला कॉफी चा रेट हा २०० % वाढलेला दिसतो, पण वास्तवात असे नाही आहे.
ह्याची नक्कल करून भारतीय पद्धतीने चाय, कॉफी व इतर भारतीय पेय, आणि भारतीय फास्ट फूड पदार्थ ठेवले तर तुफान चालेल.आधीच असे काही व्यवसाय आहेत पण. तरुण पिढी किंवा माझ्या सारख्या "समविचारी" मित्रांना मला काय बोलायचे आहे हे समजले असेल.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार