डिस्कव्हरी चॅनल वर एक कार्यक्रम लागतो किंवा तुम्ही हिस्टरी चॅनल वरील स्टेनली सुपर ह्युमन हा कार्यक्रमामधील एक थायलंड चा मु थाय एम एम ए च्या खेळाडू ची किक इतकी शक्तिशाली कशी आहे ह्यावर संशोधन करण्यासाठी आणि ह्याची सत्यता तपासण्यासाठी माणसाचे शरीर आणि हाड ह्यांचे विशेष तज्ज्ञ ह्यांना बोलावले होते, पहिला प्रयोग बाहेर आणि दुसरा प्रयोग आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या प्रोयोगशाळेत.
आता नीट लक्ष्य देऊन समजून घेऊन वाचत जाल. जेव्हा प्रयोगशाळेच्या बाहेर खेळाडू च्या किक ची चाचणी घेत होते तेव्हा झाडाला तो किती वेळ किक मारू शकतो, कुठच्या प्रकारचे झाड तो किक मारून तोडू शकतो, किती मजबूत लाकडाचा तुकडा तो तोडू शकतो असे प्रयोग चालू असतात, तो सगळ्या प्रयोगामध्ये यशस्वी होत जातो. हाच प्रयोग अगोदर सामान्य माणसाला घेऊन केला गेला, त्याच्या मर्यादा बघितल्या व त्यानंतर त्या खेळाडू ला संधी देण्यात आली. ह्यामुळे सामान्य मनुष्य आणि त्या क्षेत्रातला दररोज सराव करणारा खेळाडू ह्यामधील अंतर स्पष्ट होत होते.
जेव्हा प्रथम चाचणी घेणाऱ्यांचे समाधान झाले तेव्हा त्याने अद्यावत अश्या प्रयोगशाळेत जिथे त्या विषयातील तज्ज्ञ त्याची चाचणी घेणार होते. तिथे अद्यावत उपरकन लावून सामान्य आणि तो खेळाडू ह्यांच्या चाचणीत खेळाडू चा निकाल उपकरण हे खूप अधिक दाखवत होती. त्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांचाही विश्वास बसत नाही कारण त्या खेळाडूने जे आकडे दिले होते ते सायन्स च्या दृष्टीने अशक्य होते.
त्यांची चर्चा चालू होते. खुलासा करताना शास्त्रज्ञ बोलत होते की ह्या खेळाडूने लहानपणापासून म्यु थाय किक बॉक्सिंग च्या खेळाला सुरवात केली होती. तो खेळाडू जस जसा सराव करत होता तेव्हा त्याच्या पायातील हाडांमध्ये अति सूक्ष्म तडे पडत होते व ते भरू निघत होते. ह्या सततच्या क्रियेने वय वाढत जात आता पर्यंत त्याच्या पायांची हाड खूप मजबूत झाली आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने मनुष्य प्राण्याच्या किक ने तुटायला अशक्य वाटणारी बेसबॉल बॅट हा खेळाडू तोडू शकतो. हे सांगताना ते एक्स रे ह्यांचा वापर करत होते.
जे विज्ञानाच्या दृष्टीने अशक्य आहे ते कमी वयात सतत च्या सरावाने मनुष्य करू शकतो. ह्यालाच चमत्कार म्हणतात.
उद्योग किंवा व्यवसाय करताना असे किती तडे पडले? किती वेळा ते भरले गेले? तुमचा उद्योग, व्यवसाय मजबूत स्थितीत आहे काय? की पहिल्याच तडयाला घाबरून सोडून दिले किंवा अतिशय सांभाळत घाबरत उद्योग व्यवसाय करत आहात?
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार