विचार आणि विश्वास याची बीजे तुमच्या गर्भ संस्कारात आणि कौटुंबिक सामाजिक संस्कारात तुमच्यामध्ये रुजवली जातात. विचारांचे, विश्वासाचे झाड जर उखडायचे असेल तेव्हा लहान रोप असतानाच उखडले गेले पाहिजे, लवकर समजले तर ठीक, नाहीतर 30 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे झाल्यावर आलात तर तुम्हीच विचार करा की किती मोठे झाड झाले असेल आणि त्याची मुळे किती खोल पर्यंत गेली असतील? त्या मध्ये भर म्हणून किती चुकीच्या समजुतीचे विश्वासाचे जंगल त्याच्या भोवती झाले असेल? आणि तुम्ही अपॆक्षा करता की तुमच्या प्रशिक्षकाने ती एक दोन सेटिंग मध्ये किंवा १०, १५ दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये ते चुकीच्या विश्वासाचे, गैरसमजुतीचे झाड उखडून टाकले पाहिजे.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
0 आपले विचार