आतापर्यंत टीव्ही आणि प्रिंट मीडिया मध्ये फक्त काही घराण्याचे किंवा त्यांच्या वारसांचे जे सत्ताधारी आहेत आणि श्रीमंत आहेत, आणि त्याविरुद्ध त्यांचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी आहेत त्यांचेच चेहरे आणि बातम्या दिसतात. मोठं मोठया कंपन्यांच्या जाहिराती सतत दिसत असतात. प्रिंट मीडिया चे फुल पेज जाहिरातीचे रेट आहेत मुंबई सारख्या ठिकाणी ६० लाख रुपये, टीव्ही मीडिया वरील रेट आहेत ३,५० लाख रुपये, हे रेट क्रिकेट च्या वेळेस तर आकाशापलीकडे रेट जातात. लघु, मध्यम आणि नव उद्योजकांसाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे इंटरनेट. जिथे ते कमी खर्चात जास्ती जास्त ग्राहकांपर्यंत पोहचू शकतात किंवा उद्योगासाठी लागणाऱ्या सेवा घेऊ शकतात. जिथे करोडो रुपयांमध्ये जाहिराती बनवून देणारेही आहेत तिथे अतिशय कमी खर्चात उत्तम जाहिराती बनवून देणारे जाहिरातदारदेखील आहेत. निर्णय तुमचा, परंपरागत रित्या जायचे की काळानुसार, परंपरागत रित्या मनुष्य बैलगाडीने प्रवास करत होता आता तो विमानाने करतो, आता तुम्ही ठरवा की तुमचा उद्योग हा बैलगाडीच्या गतीने पुढे न्यायचा आहे की विमानाच्या गतीने? निर्णय तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदार पण तुम्हीच.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार