काही लोक दिवसाला 50 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 500 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 5000 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 50000 रुपये कमावतात,
काही लोक दिवसाला 500000 रुपये कमावतात.
हे झाले वास्तव, आता मी डोळे बंद करतो आणि विचार करतो की अंबानी, टाटा, बिर्ला आणि इतर गर्भ, अति श्रीमंत अस्तित्वात नाही आहे, त्यांच्या बातम्या बघणे बंद करतो, जे माझे ऐकणारे आहेत त्यानां सांगतो की दिवसाला 5 लाख रुपये कमावणे शक्यच नाही. ह्याने वास्तव बदलणार आहे का? अजून ह्यामध्ये मी बेकायदेशीर रित्या पैसे कमावणाऱ्यांचे जोडले नाही, त्यांचा दिवसाचा "खर्च" मधल्या 3 लोकांमधला असतो.
आता फक्त माझाच विश्वास नाही म्हणून वास्तव बदलणार आहे का? फक्त मी डोळे बंद केले म्हणून जगामध्ये सगळेच आंधळे होणार आहेत का? मी जर मर्यादेत पैसे कमवत असेल किंवा माझा मर्यादित दृष्टिकोन असेल तर संपूर्ण जग पण तसेच वागेल का?
माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? फक्त घरचे (मजबुरीने), मित्र मंडळी किंवा समविचारी नकारात्मक लोक, ह्यापलीकडे जग नाही आहे का?
तुम्ही ह्यावर विचार करा किंवा नका करू कारण जे वास्तव आहे ते कधीच बदलणार नाही.
धन्यवाद
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार