‘कॉलेजचं शिक्षण आणि त्यासाठी द्यावी लागणारी वर्षं हे सगळं वेळ वाया घालवण्यासारखं आहे. ते शिक्षण तुम्हाला तुमच्या नियत उद्दिष्टांपासून लांबच नेतं. औपचारिक शिक्षण नसेल; परंतु कल्पनाशक्ती असेल, मनगटात हिंमत असेल आणि स्वत:च्या कर्तृत्वशक्तीवर विश्वास असेल तर पैसा लोळण घेत पायाशी येतो. लग्न करणारी मुलगी नुसतं शिक्षण पाहात नाही, तिचं लक्ष नवऱ्याला मिळणाऱ्या पैशाकडेही असतंच असतं. समाजही तुमचं नुसतं शिक्षण पाहात नाही, तो तुमच्या जीवनातील यश पाहतो, तुमचं कर्तृत्व पाहतो आणि तुम्हाला समाजमानसात स्थान देतो.’
रितेश अग्रवाल
Founder & CEO of OYO Rooms
चला उद्योजक घडवूया
८0८0२१८७९७



तुम्ही खरच तुमच्या स्वप्न, ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात का?
जर उत्तर हो असेल तर अति उत्तम, अधे मध्ये तज्ञांनची मदत घेत चला.
जर उत्तर नाही असेल तर तुम्हाला तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाची, प्रशिक्षणाची गरज आहे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

INTERIOR CAFÉ NIGHT by Adhiraj Bose



(INTERIOR CAFÉ NIGHT by Adhiraj Bose) इंटेरियर केफे नाईट ही अधिराज बोस ह्या युवकाची आहे. ह्यामध्ये नासिरुद्दीन शाह ह्या जगप्रसिद्ध भारतीय कलाकाराने काम केले आहे. अतिशय सुंदर प्रेमावर आधारित शॉर्ट फिल्म आहे. ती दिनांक 18 जुलै ला YouTube वर प्रदर्शित केली गेली. मी बघितली 19 जुलै ला तेव्हा फक्त 14,000 लोकांनी बघितले होते. आणि आता पर्यंत 658,178 लोकांनी बघितले.
तुम्हाला सिनेमाचं काढायचा आहे तर त्या साठी थिएटर हाच एक महागडा पर्याय नाही आहे. कमी गुंतवणुकीमध्येही तुम्ही शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंट्री, लॉंग फिल्म काढू शकता. तुमची कल्पना, कथा, एडिटिंग, डायरेक्टिंग, ऍक्टिंग आणि इतर विविध कौशल्याला तुम्ही लोकांपर्यंत पोहचवू शकता. इंटरनेट हे असे प्रभावी माध्यम आहे की ते सामान्यांना, कलाकारांना, छोट्या गुंतवणूकदारांना, उद्योग, व्यावसायिकांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते.
YouTube त्या फिल्म वर जाहिराती देते, आणि त्या जाहिरातींचे विविध प्रकार आहे त्यानुसार त्या व्हिडीओची, व्यक्तीची किंवा त्याच्या कंपनीची कमाई होते. आणि हो मोठं मोठे कलाकारही YouTube वरील व्हिडीओ बघत असतात. इंटरनेट सामान्य लोकांसाठी एक कमी खर्चिक व्यासपीठ आहे, आता त्याचा कसा वापर करायचा हे तुम्ही ठरवायचे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



IIT आणि IIM ह्या भारतातील प्रसिद्ध विद्यापीठांना एकच आव्हाहन आहे, जर तुम्ही जग प्रसिद्ध आहात, तुमच्या व्यवस्थापन मध्ये, मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये इतकी क्षमता असेल तर ऍडमिशन घ्यायची लिस्ट उलट क्रमांकात लावा, घ्या कमी टक्केवाल्याला आणि तज्ज्ञ बनवून दाखवा. बघू देत तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात कि निसर्ग जो सगळ्यांना एकच नियम लावतो. निसर्ग कोळश्याला हिरा बनवतो, तुम्ही कमी टक्के वाल्याला काय बनवणार? आणि ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडले तेहि यशस्वी झाले आहेत मग त्याच्या मध्ये क्षमता नाही आहे का? नसेल तर मग त्यांना तुमच्या इंस्टीटयूड मध्ये वक्ते म्हणून का बोलावतात?
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

प्रत्येक अपयशानंतर केलेला प्रयत्न हा उद्योग, व्यवसायाला बळकटी देतो


डिस्कव्हरी चॅनल वर एक कार्यक्रम लागतो किंवा तुम्ही हिस्टरी चॅनल वरील स्टेनली सुपर ह्युमन हा कार्यक्रमामधील एक थायलंड चा मु थाय एम एम ए च्या खेळाडू ची किक इतकी शक्तिशाली कशी आहे ह्यावर संशोधन करण्यासाठी आणि ह्याची सत्यता तपासण्यासाठी माणसाचे शरीर आणि हाड ह्यांचे विशेष तज्ज्ञ ह्यांना बोलावले होते, पहिला प्रयोग बाहेर आणि दुसरा प्रयोग आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या प्रोयोगशाळेत.
आता नीट लक्ष्य देऊन समजून घेऊन वाचत जाल. जेव्हा प्रयोगशाळेच्या बाहेर खेळाडू च्या किक ची चाचणी घेत होते तेव्हा झाडाला तो किती वेळ किक मारू शकतो, कुठच्या प्रकारचे झाड तो किक मारून तोडू शकतो, किती मजबूत लाकडाचा तुकडा तो तोडू शकतो असे प्रयोग चालू असतात, तो सगळ्या प्रयोगामध्ये यशस्वी होत जातो. हाच प्रयोग अगोदर सामान्य माणसाला घेऊन केला गेला, त्याच्या मर्यादा बघितल्या व त्यानंतर त्या खेळाडू ला संधी देण्यात आली. ह्यामुळे सामान्य मनुष्य आणि त्या क्षेत्रातला दररोज सराव करणारा खेळाडू ह्यामधील अंतर स्पष्ट होत होते.
जेव्हा प्रथम चाचणी घेणाऱ्यांचे समाधान झाले तेव्हा त्याने अद्यावत अश्या प्रयोगशाळेत जिथे त्या विषयातील तज्ज्ञ त्याची चाचणी घेणार होते. तिथे अद्यावत उपरकन लावून सामान्य आणि तो खेळाडू ह्यांच्या चाचणीत खेळाडू चा निकाल उपकरण हे खूप अधिक दाखवत होती. त्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांचाही विश्वास बसत नाही कारण त्या खेळाडूने जे आकडे दिले होते ते सायन्स च्या दृष्टीने अशक्य होते.
त्यांची चर्चा चालू होते. खुलासा करताना शास्त्रज्ञ बोलत होते की ह्या खेळाडूने लहानपणापासून म्यु थाय किक बॉक्सिंग च्या खेळाला सुरवात केली होती. तो खेळाडू जस जसा सराव करत होता तेव्हा त्याच्या पायातील हाडांमध्ये अति सूक्ष्म तडे पडत होते व ते भरू निघत होते. ह्या सततच्या क्रियेने वय वाढत जात आता पर्यंत त्याच्या पायांची हाड खूप मजबूत झाली आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने मनुष्य प्राण्याच्या किक ने तुटायला अशक्य वाटणारी बेसबॉल बॅट हा खेळाडू तोडू शकतो. हे सांगताना ते एक्स रे ह्यांचा वापर करत होते.
जे विज्ञानाच्या दृष्टीने अशक्य आहे ते कमी वयात सतत च्या सरावाने मनुष्य करू शकतो. ह्यालाच चमत्कार म्हणतात.
उद्योग किंवा व्यवसाय करताना असे किती तडे पडले? किती वेळा ते भरले गेले? तुमचा उद्योग, व्यवसाय मजबूत स्थितीत आहे काय? की पहिल्याच तडयाला घाबरून सोडून दिले किंवा अतिशय सांभाळत घाबरत उद्योग व्यवसाय करत आहात?

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या माणसांना अपयशी व्यक्ती ह्या प्रयत्न करताना दिसतात,
आणि नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या माणसांना अपयशी व्यक्ती ह्या हरलेल्या दिसतात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



समस्या किंवा परिस्थिती सांगताना देहबोली किंवा आवाज बदलने हे मानसिक दृष्ट्या कमजोरीचे लक्षण असते. ह्याचा अर्थ असा कि तुम्ही त्या समस्येला परिस्थितीला आपल्यावर हावी केले आहे. ह्याला पर्याय एकच म्हणजे अपयशाला इतके सामोरे जा कि अपयशच शेवटी यशाच्या रूपाने तुमच्या आयुष्यात आले पाहिजे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



वाघ कितीही शक्तिशाली असू द्यात
पण कोल्हा कधीच तुम्हाला सर्कस मध्ये
लोकांचे मनोरंजन करताना दिसणार नाही.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



डाव्या बाजूची परिस्थिती ही समता दर्शवते,
मधली परिस्थिती ही न्याय दर्शवते,
आणि उजव्या बाजूची परिस्थिती ही आयुष्यातील वास्तव दर्शवते.
परिस्थिती बदलायला परिस्थिती स्वीकारावी लागते.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



पोकेमॉन हा गेम आणि त्याचे कार्टून हे प्रचंड लोकप्रिय आहेत. एनिमेशन आणि थ्रीडी च्या काळात आपण खूपच पाठी आहोत हे तुम्हाला त्यांचे १९८० च्या दशकातील एनिमेशन सिनेमे बघून येतील.
पोकेमॉन गो हा अँड्रॉइड गेम आभासी आणि वास्तव ह्यांचे मिलन करून बनवला गेला आहे. पोकेमॉन गो हा गेम ६ जुलै ला लौंच झाला. ह्या गेम ने आतापर्यंत 750 करोड चा नफा निंटेंडो ह्या गेम बनवणाऱ्या कंपनीला करून दिला आहे आणि ह्या कंपनीचे शेअर हे ५० % पर्यंत वाढवलेले आहे.
१८ दिवसात ७५० करोड
एका दिवसाला 41.66 करोड
अजून अधिकृत रित्या अनेक देशांमध्ये लाँन्च व्हायचे बाकी आहे.मग आता विचार करा कि ते अजून किती कमावणार.
तर्क तुम्हाला अ ते ब पर्यंत घेऊन जातो,
कल्पना तुम्हाला सगळीकडे घेऊन जाते.
आलबर्ट आईन्स्टाईन
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे
आणि तो मी "मिळवणारच".
बाळ गंगाधर टिळक
२३ जुलै १८५६ ते १ ऑगस्ट १९२०
वर्तमान काळ
(तुमचे ध्येय आणि स्वप्न) बनणे, मिळवणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,
आणि तो मी बनणारच, मिळवणारच.
उद्योजक बनणे हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे,
आणि तो मी बनणारच.
व्यावसायिक बनणे हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे,
आणि तो मी बनणारच.
गुंतवणूकदार बनणे हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे,
आणि तो मी बनणारच.
श्रीमंत बनणे हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे,
आणि तो मी बनणारच.
ह्या देशामधील, शासनामधील सर्वोच्च, उच्च पद भूषवणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,
आणि ते मी मिळवणारच, भूषवणारच.
काळानुसार विचार तोच राहतो फक्त ध्येय बदलत जातात.
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७


अनेक मराठी नव उद्योजक आणि व्यासायिक हे उद्योग, व्यवसायाची काळी बाजू समजून न घेतल्यामुळे किंवा नोकरदार घराण्यातून आल्यामुळे जिथे फक्त रोबोट सारखे आपले डोकं न लावता काम करायचे असते आणि जिथे इमानदारीत (फक्त लहान कंपनी आणि सरकारी (अपवाद वगळता), खाजगी मध्ये राजकारण व इतर गोष्टी खूप चालतात) काम करावे लागते व अतिशय संथ गतीने बढती मिळते अश्या वातावरणातून आलेले असतात म्हणून सपशेल अपयशी होतात व प्रचंड मानसिक तणावात जातात कारण आजूबाजूला तसेच वातावरण असते. मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, वास्तव स्वीकार, आपण का अपयशी झालो हे स्वतः विचार करा किंवा फक्त तज्ज्ञ लोकांचाच सल्ला घ्या, तेव्हाच तुम्हाला उद्योग विश्व कसे चालते ते समजेल.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



भारतीय आणि अनिवासी भारतीय ह्यामध्ये जमीन आसमानच फरक आहे.
शुद्ध भारतीय उद्योजक आणि अनिवासी भारतीय उद्योजक ह्यामध्येही जमीन आसमानच फरक आहे.
जेवढे शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध मोठं मोठ्या विद्यापीठातून निघत नाहीत त्यापेक्षा जास्त शास्त्रज्ञ भारतातील गावा गावातून निघालेले आहेत.
जेवढा अनिवासी भारतीय, परदेशी उद्योजक परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरतो तिथे भारतीय उद्योजक यशस्वी ठरतो.
आमच्या मध्ये आत्मविश्वास आहे, धाडस आहे, आत्मसम्मान आहे आणि महत्वाचे म्हणजे ज्ञान आणि कौश्यल्य ठासून भरलेले आहे.
आणि हे सगळे आम्ही ह्या भारतात राहून मिळवलेले आहे, त्यासाठी कुठे भारताबाहेर जाण्याची गरज पडली नाही.
थोडक्यात सांगायचे झाल्यास आमच्यामध्ये लीडरशिप क्षमता आहे, विनाकारण आमच्या डोक्यावर अनिवासी भारतीय आणि परदेशी
नागरिक आमच्यापेक्षा कुशल म्हणून मारू नका. कारण जेवढा तो कमावत नसेल त्यापेक्षा कीतितरी पटीने जास्त नफा कमावणारे
मराठी उद्योजक हे माझ्या संपर्कात आहे, जे फक्त इथल्या उपलब्धतेचा वापर करून श्रीमंत झाले आहेत ह्यामध्ये ज्ञान ही आले आहे.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



आतापर्यंत टीव्ही आणि प्रिंट मीडिया मध्ये फक्त काही घराण्याचे किंवा त्यांच्या वारसांचे जे सत्ताधारी आहेत आणि श्रीमंत आहेत, आणि त्याविरुद्ध त्यांचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी आहेत त्यांचेच चेहरे आणि बातम्या दिसतात. मोठं मोठया कंपन्यांच्या जाहिराती सतत दिसत असतात. प्रिंट मीडिया चे फुल पेज जाहिरातीचे रेट आहेत मुंबई सारख्या ठिकाणी ६० लाख रुपये, टीव्ही मीडिया वरील रेट आहेत ३,५० लाख रुपये, हे रेट क्रिकेट च्या वेळेस तर आकाशापलीकडे रेट जातात. लघु, मध्यम आणि नव उद्योजकांसाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे इंटरनेट. जिथे ते कमी खर्चात जास्ती जास्त ग्राहकांपर्यंत पोहचू शकतात किंवा उद्योगासाठी लागणाऱ्या सेवा घेऊ शकतात. जिथे करोडो रुपयांमध्ये जाहिराती बनवून देणारेही आहेत तिथे अतिशय कमी खर्चात उत्तम जाहिराती बनवून देणारे जाहिरातदारदेखील आहेत. निर्णय तुमचा, परंपरागत रित्या जायचे की काळानुसार, परंपरागत रित्या मनुष्य बैलगाडीने प्रवास करत होता आता तो विमानाने करतो, आता तुम्ही ठरवा की तुमचा उद्योग हा बैलगाडीच्या गतीने पुढे न्यायचा आहे की विमानाच्या गतीने? निर्णय तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदार पण तुम्हीच.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


बारीक होण्यासाठी जाड्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कालावधी द्यावा लागतो. पण आताच काळ असा आहे की खाजगी, वैवाहिक व्यावसायिक जीवनाच्या तणावामध्ये मध्ये लोक एकतर लगेच बारीक होतात किंवा अतिशय स्थूल होतात. बाकी आजारपण तर बोनस आहे आणि तो ही हॉस्पिटल पर्यंत घेऊन जातो.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

९ वर्षांचा लहान मुलगा व्यावसायिक हॅकर , CEO, मोठं मोठ्या कंपन्या त्याच्याकडून मदत मागतात



ज्या वयात लहान मुलं ही आपल्या स्वप्नांच्या आयुष्यात रमलेले असतात त्या वयात ह्या मुलाने तंत्रज्ञानाच्या जगतात खूप मोठे यश संपादून करून नाव कमावले आहे. 9 वर्षांचा हा मुलगा एक व्यावसायिक हॅकर, मोबाईल सॉफ्टवेअर ऍप डेव्हलपर, सायबर सिक्योरिटी तज्ज्ञ आणि ह्याही पुढे एका गेम डेव्हलपर कंपनी 'प्रुडेन्ट गेम्स' चा मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) आहे.
भारतीय मूळ चा हा मुलगा अमेरिकेत राहतो आणि सायबर गुन्हेगारांपासून लोकांना वाचवत असतो. ह्या मुलाचे नाव आहे रुबेन पौल. हा जेव्हा बोलतो तेव्हा मोठं मोठी तज्ज्ञ मंडळी व्हायचे बोलणे लक्ष्य देऊन ऐकत असते. ह्या चमत्कारिक मुलाचे कौशल्य बघून सायबर जग पण आश्चर्यचकित आहे.
हा 9 वर्षांचा मुलगा इतका मोठा कारभार कसा सांभाळतो, ह्या विषयी विचारल्यावर त्याचे वडील मनो पौल सांगायला लागले की हा सर्व करणे हे त्याची आवड आहे जी खूप लहान वयातच सुरू झाली होती आणि आता तर त्याच्या आवडीला प्रगती करण्यापासून रोखू नाही शकत.
त्याचे वडील पुढे बोलले की मला अजून तो दिवस आठवत आहे, जेव्हा तो 5 वर्षांचा होता त्यावेळेस त्याने फायरवॉल हा शब्द बोलला होता. त्याच्या तोंडातून हा शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो की कसा काय इतका लहान मुलगा ह्या शब्दाला कसा ओळखतो? तेव्हा मला त्याच्या आवडीबद्दल कळाले. मनो स्वतः ह्या क्षेत्रात काम करत आहेत, ते सेक्युरिटी सोल्युशन नावाच्या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O) आहेत.
जेव्हा रुबेन दुसरी इयत्तेत होता तेव्हा त्याच्या एका शिक्षकाने वर्गाला एक शैक्षणिक गेम बनवायचा प्रोजेक्ट दिला होता. सर्व मुलांनी हातांनी बनवलेले बोर्ड आणि कार्ड गेम बनवून आणले होते, तिकडे रुबेन ने एक शैक्षणिक अप्लिकेशनच बनवून टाकले होते. तो इतर वर्गातील मुलांना गणित शिकायला मदत करायचा म्हणून त्याचे नाव त्यांनी शुरिकेन गणित ठेवले होते.
संपूर्ण शाळेने त्याचे कौतुक केले आणि त्यांनी तो गेम एप्पल स्टोर वर पब्लिश करायला प्रोत्साहित केले. त्यानंतर त्याने आपल्या आई वडिलांकन्या मदतीने प्रुडेन्ट गेम नावाच्या कंपनीची स्थापना करायचा निर्णय घेतला. ही कंपनी शैक्षणिक गेम्स आणि एप्स बनवते. ह्यामुळे मुलं खेळता खेळता खूप काही शिकून जातात.
रुबेन सांगतो की चांगल्या हैकिंग कौशल्यामुळे तुम्हाला शक्ती मिळते, आणि जर तुमच्याकडे ती शक्ती आली तर तुम्हाला त्या साठी जबाबदारी पण उचलावी लागेल. तो पुढे म्हणत होता की तंत्रज्ञानाच्या ह्या युगात जिथे सायबर बुलिंग आणि डाटा चोरी हे सामान्य आहे, महत्वाचे हे आहे की लहान मुलांना ह्याबद्दल जागृत केले जावे जेणेकरून ते स्वतः ह्याचा शिकार होण्यापासून वाचवू शकतील.
रुबेन चे हे कौशल्य जेव्हा (ISC)2 चे कार्यकारी संचालक (executive director) हॉर्ड टिप्ट्न ला जेव्हा समजले तेव्हा त्यांनी ह्या मुलाच्या कौशल्याला सायबर सिक्युरिटी एप बनवण्यासाठी वापर करा असा सल्ला दिला. रुबेन ने आपला पहिला सायबर सीक्युरिटी एप बनवून पण टाकला ज्याचे नाव आहे क्रेकर प्रूफ, हा एप लहान मुलांना मनोरंजक आणि शैक्षणिक पद्धतीने स्ट्रॉंग पासवर्ड बनवायला शिकवतो. क्रेकर प्रूफ एप्पल स्टोर वर उपलब्ध आहे आणि रुबेन ने ह्या सारखे असे अनेक सेक्युरिटी एप्स बनवायच्या मार्गावर आहे.
रुबेन जगभरातील सिक्युरिटी कॉन्फरन्स मध्ये भाग पण घेत असतो. जेव्हा तो बोलतो तेव्हा त्या क्षेत्रातील दिग्गज लक्ष्य देऊन ऐकत असतात. ज्या वयातील मुलांना सिक्युरिटी सोबतच्या शब्दांचे अर्थ नाही समजत, त्यामध्ये हा मुलगा त्यावरती मोठं मोठे व्यख्यान देतो. रुबेन चे स्वप्न एक यशस्वी सायबर जासूस बनायचे आहे. त्याची इच्छा ही जगाला सायबर अपराधांपासून मुक्त करायची आहे.
नैसर्गिक रित्या प्रत्येकामध्ये असीम क्षमता असते. तुमच्या माझ्यामध्येही आहे. आपली क्षमता ओळखा, तिला जागृत करा.

धन्यवाद
अश्विनीकुमार फुलझेले
8080218797



अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

न्हावी ज्याच्याकडे रोल्स रॉयस पकडून ३७८ गाड्या आहेत




न्हावी ज्याच्याकडे रोल्स रॉयस पकडून ३७८ गाड्या आहेत.
प्रत्येक उद्योग, धंदा आणि व्यवसायात पैसा आहे. तो काढता आला पाहिजे.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७


एक कारखानदार अनेक छोटया मोठ्या उद्योग व्यवसायांना जन्म देतो.
उदाहरणार्थ एक पदार्थ किंवा उत्पादन बनवायचा कारखाना असेल तर
त्याला लागणारा विविध प्रकारचा कच्चा माल व इतर सेवा पुरवण्यासाठी
सूक्ष्म, लघु उद्योगांचा जन्म होतो. तोच कारखानदार मोठ्या उद्योगांना
त्यांच्या ब्रॅण्ड चा माल बनवून देतो आणि तोच कारखानदार लहान उद्योगांनाही
माल बनवून देतो जेणेकरून त्यांचे छोटे छोटे ब्रॅण्ड्स उभे राहतात.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



जो स्वाभिमानी, आत्मविश्वासू आणि धाडसी असतो तोच मातृभाषेत बोलतो.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



आपल्या आयुष्यामधील विभीषणला संपवून टाका,
जर त्याने घात केला तर तुमचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होऊन जाईल,
कोणीच म्हणजे कोणीच तुम्हाला नाही वाचवू शकत कारण तोच तुमच्या अगदी जवळचा असतो.
त्याला तुमच्या बद्दल खडान खडा माहिती असते आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत तेवढा वेळ घालवलेला असतो. त्याचा प्रत्येक वार हा खूप खोल वर होत असतो आणि तो अनेक वार लागोपाठ करू शकतो. तुमचे खाजगी, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्य तो संपूर्णपणे उद्धवस्त करू शकतो.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



मूर्खपणा आणि बुद्धिमत्ता
ह्यामधील फरक हा आहे की
बुद्धिमत्तेला मर्यादा आहे.
अलबर्ट आईन्स्टाईन

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



गाढ झोप ही मानसिक शांतता किंवा शारीरिक मेहनत (काम, किंवा व्यायाम) यांनी येते.
झोप न येणे आणि आळशीपणा हा मानसिक, शारीरिक तणाव किंवा नैराश्याने येते.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७



मनुष्य जितका शारीरिक मेहनतीने थकत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मानसिक मेहनतीने थकतो. म्हणून कमी वयातील खाजगी कंपनीमधील उच्च पदाधिकारी वयस्कर दिसून येतात.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




माणूस जेव्हा भेटतो तेव्हा त्याच्या देहबोलीवरुन त्याचा स्वभाव समजून येतो, त्यानंतर त्याने बोलायला तोंड उघडले की तो काय विचारा करत असतो हे समजून येते, प्रश्नाला तो कसे उत्तर देतो ह्यावरून त्याची मानसिक स्थिती समजून येते, जे करायला सांगितले आहे ते तो स्वतःहून करतो की नाही ह्यावरून त्याची ती गोष्ट करायची आवड किती आहे हे समजून येते. ज्याने खरच मनापासून ठरवले आहे की त्याला स्वतःला बदलायचेच आहे तो नुसता विचार करत बसत नाही तर कृती करतो, तो स्वतः बदलतो मग त्याची परिस्थिती बदलत जाते.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




आपला व्यवसाय उभा करायची उत्तम संधी ही कृषी बाजारपेठ समिती मधील व्यापाऱ्यांच्या संपामधून चालून आली आहे. माल पण आहे आणि ग्राहक पण. विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता. शेतकरी कधीच दान स्वरूपात भीक नाही मागत त्याला फक्त अडचणीत असताना मदतीची गरज आहे. आणि इथे कोण कुणावर उपकार करत नाही, सगळे समान असतात. शेतकऱ्यांना आपली गरज आहे आणि आपल्याला त्यांची.
महत्वाची सूचना :- कृपा करून भावनिक दृष्ट्या ही पोस्ट घेऊ नका. त्यासाठी इतर लोक आहेत भावनिक दृष्ट्या फायदा उचलण्यासाठी.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




आधुनिक गुलामांच्या गळ्यात, हातात
आणि पायात साखळ्या नसतात,
ते कर्जाने जखडून ठेवलेले असतात.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




माणसाच्या (जगभरातील) सामाजिक इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जाणवून येईल की
“श्रीमंत (गर्भ श्रीमंत, सत्ताधारी) लोकांमधील गरीब होण्याचे प्रमाण खूप कमी राहिले आहे.”
“गरीब लोकांचेही श्रीमंत होण्याचे प्रमाण खूप कमी राहिले आहे.”
“मध्यमवर्गीय ह्यांचे श्रीमंत होण्याचे प्रमाण खूप कमी राहिले आहे आणि गरीब होण्याचे प्रमाण खूप जास्त राहिले आहे.”
हे अजून चालूच आहे. जो काळानुसार बदलतो तोच टिकतो आणि हेच गुण अनुवांशिकतेमधून पुढील पिढीपर्यंत जात असतात व त्यांची पिढी अजून जोमाने कमी वेळेत प्रगती करत जाते. जिथे सामान्य 30 नंतर सेटल होतात तिथे ते आयुष्याची दुसरी इनिंग चालू करतात.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




आईन्स्टाईन ह्यांचा सापेक्षताची कल्पना (Relativity), सापेक्षताचा सिद्धांत (Theory of Relativity) आणि सापेक्षताचा शास्त्रीय, नैसर्गिक नियम (Law of Relativity) जो नुसता कागदावर सिद्धांत नसून जो चाचणी मध्ये सिद्ध झालेला आहे. जो जगाच्या पाठीवर कुठेही कुणाकडूनही तपासला किंवा प्रात्यक्षिक केली तर एकसारखाच निघणार आहे. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत 50 व्या मजल्यावरून तुम्ही उडी टाकली काय, मी टाकली काय किंवा बिल गेट्स ने टाकली काय गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत एकसारखाच काम करणार आहे. 
उद्योग किंवा व्यवसायाच्या तुम्ही कुठच्या टप्प्यावर आहात 1) कल्पना किंवा स्वप्न जे फक्त मनातच आहे. 2) सिद्धांत जे कागदावर उतरवले आहे, किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट समजू आपण 3) शेवटची पायरी तुमच्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवून (कृती करणे) आलेल्या समस्या सोडवत तुम्ही तुमचा नियम बनवून उद्योग किंवा व्यवसाय करत आहात काय?

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

केफे कॉफी डे (CCD) मध्ये १ कप कॉफी ची किंमत १५० रुपये का असते?




केफे कॉफी डे कॉफी नाही विकत. कॉफी ला त्यांच्या व्यवसायात कमी महत्व आहे. ते मिटिंग ची जागा, वायफाय इंटरनेट, वातानुकूलित आणि आरामदायक जागा संभाषण करण्यासाठी विकतात. ह्या सगळ्यांचा खर्च म्हणून कॉफी ची किमंत ही १५० ते २०० घरात जाते.
असे समजून चला की केफे कॉफी डे महिन्याला १००० कप कॉफी विकते. एक कप कॉफी बनवायची किमंत ही भारतीय चलनात 50 रुपये होते असे समजू. गृहीत धरा की जागेचे भाडे हे १०,००० रुपये, २०,००० रुपये हे विजेचे आणि इंटरनेट चे बिल, आणि ४०,००० रुपये हे ३ कर्मचारी व १ व्यवस्थापक (मॅनेजर) ह्यांचा पगार.
त्यांना नफा पण कमवायचा हक्क आहे, आहे की नाही? असे समजा की ते २५ % नफ्यात खुश आहेत.
एकूण गुंतवणूक = १०,००० + २०,००० + ४०,००० + १०,००० X ५० (एक कप कॉफी ची किंमत) = १,२०,०००.
नफा = २५ % = ३०,०००
एकूण = १,५०,०००
त्यांना कॉफी पुढील किमतीमध्ये विकायची गरज आहे १,५०,००० / १००० = १५० रुपये.
हेच कारण आहे की तुम्हाला कॉफी चा रेट हा २०० % वाढलेला दिसतो, पण वास्तवात असे नाही आहे.
ह्याची नक्कल करून भारतीय पद्धतीने चाय, कॉफी व इतर भारतीय पेय, आणि भारतीय फास्ट फूड पदार्थ ठेवले तर तुफान चालेल.आधीच असे काही व्यवसाय आहेत पण. तरुण पिढी किंवा माझ्या सारख्या "समविचारी" मित्रांना मला काय बोलायचे आहे हे समजले असेल.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७




उद्योग व्यवसायासंबंधी पुणेकरांचा प्रतिसाद बघून येत्या काही वर्षातच पुणे हे भारतातील उद्योग व्यवसायांचे मुख्य केंद्र होणार आहे. अनेक मोठं मोठे उद्योग आणि व्यवसाय अगोदरपासून पुण्यामध्ये चालू आहेत ज्यांनी कमीत कमी 100 करोडचा टर्नओव्हर कधीच ओलांडला आहे.
पाठोपाठ सातारा, सांगली, सोलापूर आणि नाशिक ह्या शहरांची नावे येतात.
आणि हे सर्व मराठी आहेत. ह्यामध्ये स्त्री - पुरुष, तरुण - तरुणी सगळे आघाडीवर आहेत.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




हत्तीला लहानपणापासून दोर बांधून ठेवला होता, तो लहापणी तो दोर तोडायचा खूप प्रयत्न करत होता पण यशस्वी झाला नाही, त्याचा विश्वास बसला की ती दोरी तो तोडू शकत नाही, त्याने प्रयत्न करणे सोडून दिले. वय वाढले ताकदही वाढली, मोठं मोठे वजन उचलू शकतो, भिंत पाडू शकतो इतकी प्रचंड ताकद आली पण जेव्हा त्या अवाढव्य प्राण्याला ला लहान दोरीने बांधून ठेवतात तेव्हा तो ती तोडायचा प्रयत्न करत नाही, कारण लहानपनापासून कृत्रिम रित्या रुजवलेल्या विश्वास. हा तोच विश्वास आहे जो तुम्हाला तुमच्या बालपणात मिळतो, ह्याचे अनुभव घ्यायचे झाल्यास फक्त जवळच्या लोकांना म्हणा की मला 200 करोड प्रॉपर्टी चा मालक व्हायचे आहे, पहिले टोमणे भेटतील की तू टाटा, बिर्ला की अंबानी आहेस? तेच शेअर बाझार मध्ये पैसे गुंतवू शकतात, तेच 2 तास काम करून महिन्याभराच्या कमावू शकतात, तेच मोठं मोठे उद्योग करू शकतात, तेच भारतातील सगळ्यात श्रीमंत लोक बनू शकतात (इकडे ते तू शब्द नाही वापरणार तर आपण हा शब्द वापरणार), आपण नाही. मग तुम्ही न आवडणारे दुसऱ्यांच्या हाताखाली 8 ते 16 तास सतत काम करणार, तुम्ही क्षमता असून सुद्धा ती दाबून ठेवणार, 200 काय 500 करोड ची संधी जरी आली तरी ती तुम्ही सोडून द्याल नाहीतर टाटा, बिर्ला, अंबानी किंवा रहेजा असे आडनाव असणाऱ्या लोकांना द्याल. कारण तीच विश्वासाची दोरी जी तुमच्या मनात लहापनापासून रुजवली गेली आहे जी तुमची क्षमता वाढली असून सुद्धा तुम्हाला बांधून ठेवते.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




निर्लज्ज बना. आपले अपयश हे बिनधास्तपणे चला उद्योजक घडवूया ग्रुप मध्ये सांगा. जो जिवंत असतो तोच प्रयत्न करू शकतो, फक्त मेलेला मासा हा प्रवाहासोबत वाहून जातो, आणि त्यांच्या प्रत्येक अपयशामुळे आमच्यासारख्या पुढील पिढीला काय नाही करायचे हे समजून येते. त्यांच्या अपयशामुळेचे आम्ही कमी वेळेत प्रगती करू शकलो. त्यांचे अपयश हे आम्हाला एखाद्या कंपास प्रमाणे आम्हाला योग्य दिशा दाखवत आम्हाला सुरक्षित रित्या वेळेच्या आधी आमच्या ध्येयापर्यंत, भाग्यापर्यंत पोहचवले. त्यांचे आभार जेवढे मानायचे तेवढे कमीच आहे कारण तेच आमच्या सर्वांच्या यशाचा पाया आहे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




श्रीमंत पुरुषाचा पैसा स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या कमावणाऱ्या स्त्रिया किंवा मुलींना कधीच आकर्षित करू शकत नाही.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७




हृदय भंग करणारे आणि स्वप्न भंग करणारे बाण हे खूप तीक्ष्ण असतात.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




विचार आणि विश्वास याची बीजे तुमच्या गर्भ संस्कारात आणि कौटुंबिक सामाजिक संस्कारात तुमच्यामध्ये रुजवली जातात. विचारांचे, विश्वासाचे झाड जर उखडायचे असेल तेव्हा लहान रोप असतानाच उखडले गेले पाहिजे, लवकर समजले तर ठीक, नाहीतर 30 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे झाल्यावर आलात तर तुम्हीच विचार करा की किती मोठे झाड झाले असेल आणि त्याची मुळे किती खोल पर्यंत गेली असतील? त्या मध्ये भर म्हणून किती चुकीच्या समजुतीचे विश्वासाचे जंगल त्याच्या भोवती झाले असेल? आणि तुम्ही अपॆक्षा करता की तुमच्या प्रशिक्षकाने ती एक दोन सेटिंग मध्ये किंवा १०, १५ दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये ते चुकीच्या विश्वासाचे, गैरसमजुतीचे झाड उखडून टाकले पाहिजे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




चांगला मनुष्य त्याच्याकडे भले वाईट ज्ञान असेल तो त्याचा चांगल्यासाठीच वापर करेल,
वाईट मनुष्य त्याच्याकडे भले चांगले ज्ञान असेल तो त्याचा वाईटासाठीच वापर करेल.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




मी महाराष्ट्र १ चॅनल वर निखिल वागळेंचा मुलाखतीचा कार्यक्रम आवर्जून बघत असतो, कारण का तर ते त्यांच्या प्रश्नात नेहमी विचारतात की 
१) तुमचे बालपण कसे गेले?, 
२) ह्याची मूळ बालपणातच रुजली असतील 
३) तुमचं घरचे वातावरण कसे होते? 
४) आपले विचार आणि मन ह्यांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? 
जेवढे श्रीमंत आणि यशस्वी मराठी व्यक्तिमत्व येऊन गेले मग भले ते स्त्री असो किंवा पुरुष, तरुण असो किंवा वयस्कर त्यांचे उत्तर सकारात्मकच होते, त्या प्रत्येकांना घरातून संपूर्ण पाठिंबा मिळालेला होता मग भले तो आर्थिक असो किंवा मानसिक. हेच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. आयुष्य जगणे सोपे आहे, मनुष्य ते कठीण करून टाकतो.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




तुम्ही माणसाला मासे विका, तो त्या दिवशी खाईल,
तुम्ही त्याला मासे कसे पकडायचे हे शिकवले तर
तुम्ही तुमचा व्यवसायिक ग्राहक गमावून द्याल
आणि एक व्यवसायिक प्रतिस्पर्धी निर्माण कराल
जो संधी आणि नफा ह्या दोघांमध्ये भागीदार बनेन.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

कॉर्पोरेट जगाकडून तुम्ही कुठचे महत्वाचे धडे घेतात?



१) दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 ही दिवस काम करणाऱ्यासोबत स्पर्धा करू नका. कोणीतरी तुमच्यापेक्षा ज्ञान आणि काम ह्या बाबतीत जास्त माहिती असणारा असतोच. त्या दिवसाचे काम पूर्ण कार्यक्षमतेने करा. कामाच्या आयुष्यात संतुलन ठेवा.
२) शाळा आणि विद्यापीठातील माहितीच्या सहकाऱ्याशिवाय कुणालाही जवळचा मित्र बनवू नका.
३) मालकासोबत इमानदार राहू नका. तुम्ही फक्त त्यांच्यासाठी एक कर्मचारी असता.
४) प्रत्येक शब्द आणि वचन हे इ मैल स्वरूपात घ्या. कोणीही कधीही पलटू शकतो.
५) कामाच्या ठिकाणी कुणावरही राग व्यक्त करू नका.
६) खाजगी, कौटुंबिक समस्या कधीच सांगत बसू नका, ना चर्चा करा.
७) कुणासोबतही प्रेम किंवा शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नका. प्रामाणिक दृष्टिकोनातून संबंध ठेवा.
८) सतत शिकत रहा. हे तुम्हाला जी परिस्थिती आवडत नाही किंवा जो, जी आवडत नाही त्यासमोर आत्मविश्वासाने वावरू शकता.
९) कपडे चांगले, व्यवस्थित घाला.
१0) जास्त इमानदार राहू नका.



- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
कॉर्पोरेट सल्ला व प्रशिक्षण (वैयक्तिक)
८०८०२१८७९७




बुद्धिबळाचा एक नियम लक्ष्यात ठेवा
कमजोर शिपाई पण शेवटच्या घरात पोहचून
पाहिजे तो प्यादा बनू शकतो.
मर्यादा तोडण्यासाठी मर्यादेपलीकडे एक पाऊल टाकावे लागते,
तिथपर्यंत पोहचण्यासाठी संघर्ष करत जीवंत राहावे लागते,
त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि घ्यावा लागतोच
की तुम्हाला वजीर बनायचे आहे की इतर प्यादे.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

चेकमेट कंपनीवरील दरोडा आणि विजय माल्ल्याचा दरोडा आणि शेतकरी आत्महत्या

चेकमेट कंपनीवरील दरोडा आणि विजय माल्ल्याचा दरोडा आणि शेतकरी आत्महत्या
तुम्ही नुकतीच एक बातमी ऐकली असेल "चेकमेट कंपनीवर दरोडा, चोरट्यांनी काही करोड लुटले". आता मी आपण आपले आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन कसा हे विस्ताराने सांगेन. अगोदर असे चोरी दरोडे घालायचे प्रकार चालायचे पण आता काळ बदलला, आताच दरोडा म्हणजे तुमच्या समोर निर्लज्ज पणे घालतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही.
उदाहरणार्थ, मोबाईल नेटवर्क पुरवणारी कंपनी जिचे ग्राहक कमी पकडूया उदाहरणादाखल 3 करोड जी ग्राहकांना न सांगता 2 रुपये किमतीची रिंगटोन ऍक्टिव्ह करते म्हणजे 3,00,00,000 x 2 = 6,00,00,000 सहा कोटी, म्हणजे काही न करता 6 कोटी मिळवले. जे तक्रार करतात तेवढे ग्राहक कमी करूया 1,50,00,000 म्हणजे पुढच्या महिन्याला 3,00,00,000 कमावून जातात, हे चक्र असेच चालू राहते आणि ह्यामध्ये पोलीस तक्रार पण नाही करता येत. ती गोष्ट वेगळी आहे की पोलीस पण ह्याचे शिकार झालेले आहेत.
ह्याला बोलतात खाजगी पण कायदेशीर दरोडा. सरकारी दरोडा काय असतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि आपल्याच परिसरातील नगरसेवक, आमदार आणि खासदार अचानक 1 रूम किचन मधून करोडपती कसे होतात हे मला अजून समजले नाही आणि त्यांच्या भोवती लोकांची इतकी गर्दी का असते हे पण कोडेच आहे. सरकारी अधिकाऱ्यांची कशी बार मध्ये मिटिंग होत असते हे तर ज्याचे त्या कार्यालयाशी संबंध सतत येत असतो किंवा काम करत असतो त्याला चांगलेच माहीत असेल. तेव्हा आयकर विभाग, पोलीस आर्थिक गुन्हे विभाग कुठे असते ते माहीत नाही.
सगळ्यात जास्त दरोडा पडतो तो भावनिक दरोडा, एकदा एक प्रसिद्ध संत म्हणू की बाबा तो आमच्या परिसरात येणार होता त्या साठी लोकांनी प्रचंड मोठी रांग लावली होती, उच्च शिक्षित पासून अडाणी लोकांपर्यंत सगळे त्या रांगेत होते. माझी एक्स पण त्या रांगेत होती, मग तर चिडवणे आलेच कारण मी नास्तिक आहे ते तिला चांगलेच माहीत होते.
जेव्हा त्या प्रसिद्ध संत बाबांच्या गाडीचा ताफा आला तेव्हा मी बघतच बसलो. नक्की तो संत आहे की कोणी बडा उद्योगपती? शेवटी नोकरी करून पैसाच कमवायचा आहे ना? मग आमचे आई वडील शाळेत पाठवण्याच्या जागी जंगलात कुणा बाबाकडे का नाही पाठवले? आम्ही पण अश्या गड्याचा ताफा घेऊन फिरलो असतो. मग असे वाटायचे की आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांची मर्यादेपर्यंतची प्रगती मान्य आहे त्यापुढे अमर्याद प्रगती ह्या संत बाबांसारखी मान्य नाही.
आता परत विषयाकडे येतो. चेकमेट कंपनीची सेवा पुरवायची कल्पना मला चांगलीच आवडली, अश्या अनेक सेवांची गरज सरकारी व खाजगी कंपन्यांना लागत असते. उद्योग, व्यवसाय खूप आहेत फक्त बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे आणि जो प्रयत्न करत असतो त्यालाच भेटते.
ज्यांनी दरोडा टाकला त्यांच्यात हिम्मत आणि धोका पत्करायचा गुण तर आहेच ह्याबद्दल काही शंका नाही, जर इतकाच धोका पत्करायचा असेल मग कुठचा छोटा उद्योग किंवा व्यवसाय का नाही करायला घेतला? उद्या कदाचित तो उद्योग किंवा व्यवसाय इतका मोठा झाला असता की ज्या कंपनीवर दरोडा टाकला आहे त्याच कंपनीला विकत घेतले असते त्यांनी.
दुसरा पर्याय त्याच कंपनीत काम करून सगळी कामे शिकून, इतरांच्या पेक्षा जास्त काम करून, अष्टपैलू कामगिरी करून बढती घेत उच्च पदावर पोहचला असता, भागीदार झाला असता किंवा आपली स्वतःची नवीन कंपनी चालू केली असती.
आता विजय माल्ल्या बद्दल, तो सतत दरोडा टाकत होता, त्याला कोणीही पकडले नाही, का नाही पकडले? जितक्या तत्परतेने ह्या दरोडेखोरांवर कारवाई केली तितक्याच तत्परतेने का नाही केली? बर ते जाऊ द्या, विजय माल्ल्या किंवा त्या इतर कंपन्यांनी दरोडा कसा टाकला? कंपनीच्या नावर लोन काढले आणि कंपनी तोट्यात दाखवली पण त्याच्या जीवनशैलीमध्ये काहीच फरक पडला नाही.
इकडे शेतकरी लोन काढतो त्याच्या पाठी ससेमिरा लावला जातो, त्याच्या जीवनशैलीत फरक पडतो, गरीब होतो, त्याच्या मुलांचे शिक्षण, लग्न होत नाही, मग हा समाज त्याला आत्महत्येकडे ढकलून देतो. राजकारणी समाजातूनच निर्माण झाले आहेत, सरकारी उच्च पदाधिकारीसुद्धा म्हणजे आपण अप्रत्यक्ष रित्या जबाबदार आहोत. खाजगी बडे उद्योजक लोन बुडवून श्रीमंत आणि गरीब शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय अजून गरीब आणि गुन्हेगार. पोलीस क्षणात तुमच्या दारात हजर आणि विजय मल्ल्या सर्वात जास्त सुरक्षित असलेल्या विमानतळावरु परदेशाला रवाना.
(हा परिच्छेद गाळण्यात आला आहे.)
ज्ञान कसे वापरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाहीतर कोर्टात करोडो केसेस पेंडिंग नसत्या राहिल्या, ना इतके भ्रष्टाचार झाले असते, ना न्याय व्यवस्थेची गरज भासली असती. वर्तमान काळात जे चालले आहे त्यावर लक्ष्य ठेवत जा, जर कोणी तुम्हाला भूतकाळाच्या इतिहासात रममाण करत असेल त्यापासून कोसो दूर राहा.
अर्थकारणाशी संबंधित प्रत्येक घटना समजून घेत जा. चांगलं किंवा वाईट हा विचार करत बसू नका, जगामध्ये हे चालूच राहणार आहे. फक्त ह्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नकारात्मक नको व्हायला. उद्या काही घटना घडलीच तर तुम्ही त्याचा उत्तम रित्या सामना करू शकता. आयुष्याच्या रस्त्यावर वळण घ्यावेच लागते.
मला तुम्हाला तुमच्या मधले जन्मजात असलेले गुण, तुमचा दृष्टिकोन आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा घेतल्यामुळे झालेला दुष्परिणाम, अति घाई जी आजकाल सगळीकडे दिसून येते आणि ह्यामुळे होणारे आयुष्यातील शारीरिक, भावनिक अपघात हे सगळे ह्या घडलेल्या घटनेमधून सांगायचे आहे.

धन्यवाद

अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७