भांडवलशाही अर्थव्यवस्था जगामध्ये ज्या देशात गेली मग तो लोकशाही देश असो, राजेशाही किंवा साम्यवादी तिथे सामान्य जनतेला देशोधडीला लावले आणि राजकारणी, मोठे उद्योगपती आणि धार्मिक नेते यांना अक्षरक्ष अब्जोपती केले. जगामध्ये देशांच्या प्रगतीपेक्षा अब्जोपती ते खरबोपती लोकांच्या प्रगतीच्या बातम्या जास्त भेटतील कारण मीडिया सुद्धा भांडवलशाही मध्ये येते. गरिबांच्या, सामान्यांच्या बातम्या फक्त दिखाव्यासाठी असतात. जो कोणी उद्योजक मग तो आपल्या देशातील उद्योजक ज्याने देश बाहेर गुंतवणूक केली असेल किंवा करत असेल किंवा बाहेरून इथे नफ्या साठी आलेले उद्योजक असू देत, त्यांचे ध्येय एकच असते, "नफा कमावणे". स्वाभिमानाने जिवंत राहायचे असेल तर ह्याला पर्याय एकच भांडवलशाही मानसिकता उपजत करणे किंवा साक्षर बनणे. नाहीतर जागतिक मंदीच्या लाटेमध्ये तुम्हीसुद्धा वाहून जाल.
निर्णय तुमच्या हातात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार