एकदा बेरोजगार युवतीने साफ सफाई च्या कामासाठी मायक्रोसॉफ्ट मध्ये अर्ज केलेला असतो. तिथे तिची कामासंदर्भात परीक्षा चालू असते, मुलाखत घेणारा तिची साफ सफाई करणे नीट बघत असतो.
मुलाखत घेणारा : आपली निवड करण्यात आली आहे. तुम्ही मला तुमचा इमैल द्या, तुम्हाला एक फॉर्म भरण्यासाठी पाठवून देतो.
बेरोजगार युवती : माझ्याकडे संगणक नाही आहे आणि इमैल हि नाही आहे.
मुलाखत घेणारा : मला माफ करा, जर आपल्याकडे इमैल नाही तर आपले अस्तित्वच नाही आहे. आणि ज्याचे अस्तित्व नाही आहे त्याच्यासाठी आमच्याकडे काम नाही आहे.
बेरोजगार युवती मुलाखत घेनाऱ्या कडून व त्या मोठ्या कंपनीकडून काही आशा न ठेवता निघून जातो.
तिच्या कडे असलेल्या फक्त ३०० रुपयांचे काय करायचे ते माहित नसते. मग ती बाजारात जायचे ठरवते, व १० किलो टमाटे विकत घेते. घरो गरि जावून ती टमाटे विकते. दोन तासांपेक्षा पण कमी वेळेत ती तिचे भांडवल दुप्पट करण्यात यशस्वी होते. हीच संकल्पना ती ४ वेळेस परत करते,
१२०० रुपयांच्या नफ्यासोबत ती घरी परतते. त्या युवतीला समजते कि ह्या मार्गाने ती कमवू व जगू शकते, मग प्रत्येक दिवशी लवकर घरातून निघते आणि उशिरा घरी येते. प्रत्येक दिवशी तिचे पैसे दुप्पट, तिप्पट होत जातात. काही कालावधीने ती हातगाडी घेते, नंतर मालवाहू रिक्षा घेते, नंतर ट्रक घेते, आता तिच्याकडे माल वाहन करणाऱ्या गाड्यांचा ताफा असतो. ५ वर्षानंतर ती युवती हि भारतातील सर्वात मोठ्या अन्न धान्य विक्रेत्यापैकी एक होते.
ती आपल्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल योजना करत असते आणि जीवन विमा पॉलिसी काढायचे ठरवते. ती एका विमा विक्रेत्याला बोलावते आणि एक संरक्षण जीवन विमा निवडते. संभाषणाच्या शेवटी विमा विक्रेता तिला तिचा इमैल आयडी मागतो.
युवती : माझ्याकडे इमैल आयडी नाही आहे.
विमा विक्रेता (कुतुहलाने) : आपल्याकडे इमैल आयडी नसून सुद्धा इतके मोठे उद्योगाचे साम्राज्य उभे केले. तुम्ही कधी कल्पना केली का जर तुमच्या कडे इमैल आयडी असला असता तर तुम्ही कुठपर्यंत पोहचला असता ते?
त्या युवतीने थोडा विचार केला आणि उत्तर दिले कि
"हो, मी आता पर्यंत मायक्रोसॉफ्ट मध्ये साफ सफाईचे काम करत बसले असते!"
कथेचा सारांश:
१) इंटरनेट, इमैल, बिबिम, व्हास्टएप, हे तुमच्या आयुष्याचे उपाय किंवा समाधान नाही आहेत.
२) जर तुमच्या कडे फेसबुक अकाउंट, इंटरनेट, इमैल, बिबिम, व्हास्टएप नसेल आणि हुशारीने, मेहनतीने उद्योग किंवा व्यवसाय केलात तर तुम्ही पण करोडपती बनू शकता.
नेहमी एक लक्ष्यात ठेवा कि माणसाने ह्या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत, मग जी गोष्ट एका माणसाने निर्माण केली आहे तीच गोष्ट जर दुसऱ्या माणसाला येत नसेल तर तो कमी कसा ठरेल?
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार