मानसिक दृष्ट्या कमजोर माणसे कशी ओळखायची?




जे सतत एक सारखे आयुष्य जगत असतात.

टीव्ही, पेपर किंवा रस्त्यावर ऐकलेल्या बातमीची समीक्षा न करता सत्य मानून एक तर अत्यंत रंगाच्या भारत किंवा अत्यंत घाबरून प्रतिक्रिया देतात.

एक विशिष्ट विचारसरणीला न तपासता आत्मसात करतात, ज्या मध्ये फक्त भडकवण्याचे लेख लिहिलेले असतात.

आपल्या विरुद्ध विचार असलेल्यांचा मनातल्या मनात द्वेष करत असतात.

अत्यंत श्रद्धाळू असतात, घरात, पाकिटात अनेक देवांचे फोटो आणि हातात, गळ्यात अंगठ्या, तावीज असतात.

भले तो समाजात प्रतिष्ठित असला तरी त्याचे घरचे वागणे खूप वेगळे असते.

सतत पिढ्यान पिढ्या एक समूहाच्या सावलीत राहण्याचा प्रयत्न करत असतो.

बाहेर जरी तो शांत असला तरी घरी तो कुणाच्याच मताला आदर देत नाही, हुकूमशाही पद्धतीने वागत असतो.

तो एकाच्या बोलण्याला प्रतिसाद न देता प्रतिक्रिया देतो.

दुसऱ्यांवर संपूर्णपणे अवलंबून असतो. उदाहरणार्थ सरकार.

तो कधीच प्रगती करायचा प्रयत्न करत नाही आणि धोका तो पत्कारत नाही.

इतर जीवनावश्यक वस्तू ह्या एक रुपयाने जरी वाढल्या तर तो इतका आकांड तांडव करतो की ह्या अगोदर कधीच महागाई झालीच नाही. सरकार ला तो कधीच काही नाही बोलणार पण आपल्या घरच्यांना खर्च कमी करण्याचा हुकूम देईल.

आकांड तांडव ह्यासाठी पण लोक करतात ज्या मुळे त्यांचे नाकर्तेपणा झाकले जाईल व सर्व दोष सरकार व समाजाला जाईल.

काळानुसार महागाई वाढतच जाणार आहे त्यानुसार आपल्याला आपली कमाई देखील वाढवावी लागते, ह्यासाठी भूतकाळातील चुकांपासुन शिकून वर्तमानात बदल करून उज्वल भविष्य बघत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करावे लागतात हे नकारात्मक माणूस करूच शकत नाही, तो फक्त दुसऱ्यांना दोष देत बसतो.

जगातील सर्वात पहिली मनुष्य प्राण्यात गुलाम झालेला प्राणी म्हणजे स्त्री. सर्व नकारात्मक गोष्टींचे खापर स्त्रियांवर फोडले जाते, मग ती घरची बायको असो, मुलगी असो किंवा बहीण. आणि जेव्हा दुसऱ्या घरातल्या किंवा समाजातील स्त्रियांवर बोलायचे झाल्यास सगळ्या मर्यादा मोडल्या जातात.

भूतकाळातील एखादा प्रसंग सतत सांगत बसतात, न वैतागता. अपयश तर एखाद्या यश्यासारखे मिरवत सतत सांगत असतात.

स्वतःची चूक उभ्या आयुष्यात मान्य करणार नाही.

वयानुसार मिळणाऱ्या आदराला तो नकारात्मक कर्तृत्वानुसार मिळणार आदर समजतो.

मैत्री पूर्ण स्वभाव हा तर विसरूनच जा. ते संपूर्ण कुटुंब हे तणावात जगत असते.

घरी येणाऱ्या नकारात्मक लोकांची संख्या वाढत जाते.

मुलांचे एक अपयश हे एखाद्या मोक्का लागलेल्या गुन्ह्यासारखे वाटू लागते व त्यांचे प्रयत्न करणे बंद करून टाकतात.

थोडक्यात जिवंतपणी मेल्यासारखे आयुष्य जगत असतात, आणि हेच पुढच्या पिढीला लहान पणापासून संस्कार देत पुढे वारसाहक्काने ही विचारसरणी दिली जाते.


अशी अनेक उदाहरण देता येईल, माणसाने तोंड उघडले की तो काय विचार करतो हे समजून येते, काही कालावधी घालवला की त्याचा स्वभाव कळून येतो. आणि स्वभाव हा बदलू शकत नाही.

मानसिक दृष्ट्या सक्षम, सजग लोकच अश्या लोकांना ओळखून त्यांना उत्तमरीत्या टाळू किंवा हाताळू शकतात. आणि इथेच आत्मविकास कामी येतो.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार