सज्जन माणसांनी श्रीमंत व्ह्यायला हवे




अति पैसा दुखाचे कारण आहे. अति पैसा हाती आला कि माणूस वाया जातो. अति पैश्याची हाव वाईट मार्गाला नेते. अशा आणि अश्या अर्थाच्या कित्येक शिकवणी लक्ष्यात घेतच लहानपणापासून वाढ झाली तर पैसा हे सर्व दुखाचे मूळ कारण आहे हा समज पक्का होतो. मात्र थोडे मोठे झाले कि लक्ष्यात येते, पैशाने कुठलेही काम करता येते. मनावर झालेले संस्कार आणि प्रत्यक्ष व्यवहार यात तफावत जाणवत राहते आणि मग पैसा चांगला कि वाईट ह्या चक्रात माणूस अडकून जातो.
खर तर पैसा चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो, हे आपल्यातल्या प्रत्येकाला पटेल. कारण ज्याच्या हाती पैसा असतो तो ठरवतो पैसा कसा वापरायचा ते. पैसा भुकेल्याच्या हातात गेला तर तो त्यातून भाकरीची तजवीज करेल. पैसा गरीबाच्या हाती गेला तर तो त्या पैशालाच आणखी पैसा जोडता येईल का याचा विचार करेल. कुणा सज्जनाकडे गेला तर तो दुसऱ्याचे दुख कमी करण्यासाठी याचा वापर करेल. श्रीमंताच्या हाती गेला तर या पैशांतून अजून जास्त पैसे कसे कमावता येतील याचा विचार करेल आणि दुर्जनांच्या हाती गेला तर तो वाईट कामावर, दुसर्यांना नुकसान होईल अश्यावर खर्च करेल.
सांगायचे म्हणणे हे कि ज्या रंगात पाणी मिसळतात तो रंग पाण्याला प्राप्त होतो, तसेच ज्याचा जसा स्वभाव आणि बुद्धी त्यानुसारच ती पैश्याचा विनयोग करेल.
पण हे सारे जरी सत्य असले तरी आपण काही दुर्जन नाही. आपल्यालाही पैसा आवश्यक आहे. एका ठराविक टप्प्यावर आपल्याकडेही या पैश्यामुळे सुबत्ता येईल. त्यानंतर अतिरिक्त पैसा जमायला लागला तर आपण त्या पैशांचा उपयोग गरिबांसाठी, चांगले काम करणाऱ्यांसाठी हि करू शकतो. पण हे केव्हा तर जेव्हा आपल्या हाती पुरेसा पैसा असेल तेव्हा.
उदाहरणादाखल तुम्हाला एक गरीब माणूस भेटतो, तो अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा असतो, तो माणूस तुमच्याकडे मदत मागायला येतो पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे तुम्ही मदत करू शकत नाही. विचार करा. असे का? कारण तुम्ही फक्त तुमचाच विचार करायला सुरवात केली, तुमच्याकडे जर अतिरिक्त पैसा असता तर तुम्ही त्याला मदत करू शकला असता. म्हणजे सज्जन माणसांनी श्रीमंत व्हायला हवे, कारण तेव्हाच हि माणसे गरजवंताला मदतगार ठरू शकतील.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार