कावळा दररोज झाडावरती काहीही न करता दिवसभर बसून असायचा.
एक लहान ससा कावळ्याला विचारतो "मी पण तुझ्यासारखा काही न करता दिवसभर बसून राहू शकतो का?"
कावळा म्हणतो "हो नक्की, का नाही?"
ससा ज्या झाडावर कावळा बसलेला असतो त्या झाडाखाली जमिनीवर बसून आराम करायला लागतो.
तेवढ्यात तिचे एक कोल्हा येतो....
सस्यावर झडप घालतो आणि त्याला खावून टाकतो.
ह्या कथेतून हा बोध घ्यायचा आहे कि जर तुम्ही बसून आहात, काही नाही करत आहात तर तुम्हाला खूप उंचावर बसावे लागेल. आजच्या भाषेत जर तुमच्याकडे पैसा आणि ताकद आहे म्हणजे तुम्ही उंचवर बसून आहात, जर तुम्ही मध्यम वर्गीय, गरीब किंवा अतिशय गरीब आहात तर तुम्ही ह्या जगामधील कोल्हा, वाघ, सिंह व अस्वल अश्या मानसिकतेचे शिकार बनू शकता.
धन्यवाद.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार