FDI आणि आपण “जो परिस्थितीनुसार बदलेल तोच टिकेल”




जेव्हा 90 साली थेट परकीय गुंतवणूक (FDI) साठी प्रयत्न चालू होते तेव्हा भारतीय लोक त्याला विरोध करत होते. राज्यकर्ते (राजकारणी, उद्योजक, धार्मिक गुरु) मग ते जगामध्ये कुठल्याही देशाचे असू देत ते एक सुंदर पर्याय निवडतात "फोडा आणि राज्य करा" तेच आपल्या इथे वापरले गेले. लोकांनी स्वतःहून फूट पडून घेतली आणि अनेक वर्ष त्यामध्ये गुंग राहिले तोपर्यंत खाजगी कंपन्यांनी इथे आपले बस्तान बसवले पण.

हा काळ अक्षरक्ष रॉकेट च्या गतीने प्रगती करण्याचा होता आणि ती अनेक लोकांची झाली पण, त्यापैकी काही असे होते ज्यांना आपोआप फायदा मिळत गेला. सरकारी नोकऱ्या हळू हळू बंद करत गेले आणि आता अशी वेळ आली की तात्पुरते कर्मचारी हे मोठ्या संख्येने वाढले, जागा निघाली तरी खूपच कमी ज्यासाठी हजारोंच्या (काही ठिकाणी लाखोंच्या) घरात अर्ज येतात. ह्यामध्ये जे धाडसी होते त्यांनी खाजगी नोकरीमधून प्रगती केली. ती वेळ निभावून नेऊन आता उच्चं पदावर पोहचले आहेत.

काही केले तरी बाजारपेठ तर आता मुक्त झालीच आहे तर का नको त्याच्या नुसार चालावे? निसर्गाचा नियम आहे "ताकदवर जीव जगत नाही, जो बदलानुसार आपल्या मध्ये बदल घडवतो तो जीव जगतो" नाही तर डायनासोर आता जिवंत असले असते आणि झुरळ हे कधीच संपून गेले असते. FDI जर आलेच आहे तर का नाही स्पर्धेला सामोरे जायचे? आज ना उद्या हे होणारच आहे कारण सामान्य लोक एकत्र येऊ शकत नाही, त्यांची संख्या अब्जोच्या घरात आहे, मुठ्ठी भर सत्ताधीश एकत्र येऊ शकतात आरामात कारण त्यांचंही संख्या 500 च्या घरात आहे.

आपण हत्ती आहोत आणि ते आपले माहूत आहे त्यामुळे आपण त्यांच्या ताब्यात आहोत. एक माहूत इतक्या मोठ्या हत्तीसारख्या प्राण्याला आपल्या ताब्यात ठेवतो. असे जगातील काही मुठ्ठीभर श्रीमंत लोक कायदा, पोलीस आणि सैन्य ह्या अंकुशच्या मार्फत अब्जो लोकांना आपल्या ताब्यात ठेवतात.

जर आपल्यासमोर कोणी ताकदवर उभा असला तर त्याच्याशी मैत्री करायची की वैर? ह्यासाठी कुठच्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेण्याची गरज तर नाही ना? इतका तरी तुम्ही विचार करू शकता ना? मग ह्याला पर्याय काय? एक्दम सोपा पर्याय आहे, जो मार्ग ह्यांनी निर्माण केला आहे त्या मार्गाने चालत जाऊन आपला फायदा करून घेणे हेच होय.

जग काय बोलत ह्या कडे लक्ष्य देत बसाल तर उभ्या आयुष्यात पुढे नाही जाणार. जे आपल्या मनाला वाटेल तेच कराल. सल्ला पण तज्ज्ञ लोकांचा घेतलेला बरा. कारण जग म्हणजे सामान्य लोक, जे एक यांत्रिक मानवासारखे प्रोग्राम केल्यासारखे तोच तोच विचार आणि कृती करत राहतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई च्या लोकल मधील गोष्टी ऐकल्यावर समजेल.

काही कठीण नाही, पण नुसता तोच तोच विचार करत बसलात तर ते अजून कठीण होऊन जाईल. आणि त्यामुळे नकारात्मकता वाढत जाईल. कुठल्याही परिस्थितीचे विरोध किंवा समर्थन करत बसू नका, समजून घ्या व स्वाभिमानाने जगता येईल अश्या तर्हेने स्वतःमध्ये बदल करून उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार ताठ मानेने जगा.
मी इथे पुढे जात नाही कारण प्रत्येक माणूस हा स्वभावाने, परिस्थितीने आणि विविध कारणांनी वेगळा असतो आणि मी माझा दृष्टिकोन त्यांच्यावर थोपवलेला मला आवडणार नाही. तुमचा दृष्टिकोन म्हणजे तुमचे अंतर्मन जे जन्मजात असते आणि जे कोणीच बदलू शकत नाही आणि माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही आहात तसे परिपूर्ण आहात.

मला विनाकारण लोकांना भ्रमात ठेवायला आवडत नाही, जे सत्य आहे तेच मांडतो. सत्य ते सत्यच असत कुणाला पटो किंवा न पटो. सूर्य हा पूर्वेकडूनच उगवणार, शत्रू-मित्र, चांगला किंवा वाईट हे श्वास घेताना ऑक्सिजनच वापरणार, निसर्ग भेदभाव करत नाही, आपण करतो.  मिल कामगार, छोटे उद्योजक संपताना बघितले आहेत. मी फक्त मार्ग दाखवू शकतो, चालायचे तुम्हालाच आहे.

काही शंका असल्यास फोन, व्हाट्सअप किंवा इमेल कराल.

धन्यवाद  
चला उद्योजक घडवूया

अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७  

बुटका धाडसी चंगेझ खान आणि त्याने हरवलेले बलाढ्य धडधाकट युरोपिअन शत्रू सैन्य



 चंगेझ खान हा जग प्रसिद्ध ऐतिहासिक राजा होवून गेला होता. तो उंचीने बुटका होता, बारीक डोळ्याचा चायनीज होता. त्याच्या मध्ये धाडस खूप होते. आशिया खंड हा त्याने आरामत जिंकला होता, पण जेव्हा तो युरोप जिंकायला निघाला होता तेव्हा चित्र काही वेगळेच निघाले. युरोप चे शत्रू सैन्य हे सहा सात फुट उंच आणि धडधाकट होते. त्यांच्या तलवारी मोठ्या होत्या व मजबूत चिलखत होते.

               चंगेझ खान ने विचार केला कि मी ह्यांच्याशी सरळ युद्ध केले तर कधीच जिंकू नाही शकणार. विचार करता करता चंगेझ खान ला एक कल्पना सुचली, तो शत्रूवर सरळ हल्ला नव्हता करत, तो त्यांची हत्यार, दारू गोळा आणि चिलखत जिथे ठेवली होती त्या ठिकाणांवर हल्ला करून तो नष्ट करत होता. जिथे जिथे शत्रूंची हत्यार ठेवायची ठिकाण होती ती त्याने सगळी उध्वस्त करू ठेवली होती.

               मग तो लढताना घाबरून पळून जायचे नाटक करत होता, त्यावेळी जेव्हा शत्रू सैन्य त्याचा पाठलाग करायचे तेव्हा त्याच वेळेला धावत्या घोड्यावरून पाठी वळून तो शत्रूवर बाण चालवायचा ज्यामुळे शत्रू मारून जायचा.

               विचार करा जर आयुष्य जगण्याची लढाई लढताना कोणी तुमचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शस्त्र आणि ढाल नष्ट करून टाकले तर तुम्ही लढणार कसे?

               हे वास्तव आयुष्य आहे, इथे दुसरी संधी नाही भेटत, तुमचे आयुष्य तुमच्या साठी किमती आहे, न कि जगासाठी. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ह्या हत्यारांनी मजबूत होण्यासाठी आजच संपर्क कराल.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




भांडवलशाही अर्थव्यवस्था जगामध्ये ज्या देशात गेली मग तो लोकशाही देश असो, राजेशाही किंवा साम्यवादी तिथे सामान्य जनतेला देशोधडीला लावले आणि राजकारणी, मोठे उद्योगपती आणि धार्मिक नेते यांना अक्षरक्ष अब्जोपती केले. जगामध्ये देशांच्या प्रगतीपेक्षा अब्जोपती ते खरबोपती लोकांच्या प्रगतीच्या बातम्या जास्त भेटतील कारण मीडिया सुद्धा भांडवलशाही मध्ये येते. गरिबांच्या, सामान्यांच्या बातम्या फक्त दिखाव्यासाठी असतात. जो कोणी उद्योजक मग तो आपल्या देशातील उद्योजक ज्याने देश बाहेर गुंतवणूक केली असेल किंवा करत असेल किंवा बाहेरून इथे नफ्या साठी आलेले उद्योजक असू देत, त्यांचे ध्येय एकच असते, "नफा कमावणे". स्वाभिमानाने जिवंत राहायचे असेल तर ह्याला पर्याय एकच भांडवलशाही मानसिकता उपजत करणे किंवा साक्षर बनणे. नाहीतर जागतिक मंदीच्या लाटेमध्ये तुम्हीसुद्धा वाहून जाल.
निर्णय तुमच्या हातात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७




मी असे ऐकले आहे
की रिलायन्स चा मालक
मुकेश अंबानी हा दिवसाला
४,९३,१५० रुपये कमावतो.
मी पण त्याच्या
इतकी कमवू शकते.
मी आता दिवसाला
५०० रुपये नोकरी
करून कमावते....
…मला फक्त
एकाच वेळी
९८७ नोकऱ्या
करण्याची गरज आहे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




वर्तमान परिस्थिती नुसार
भारतातील श्रीमंत व्यक्ती ह्या
टाटा
बिर्ला
अंबांनी
की
पाटील
कांबळे
देशपांडे
हा परिणाम आहे आपल्या परंपरागत चालत आलेल्या विश्वासांचा, जर पुढच्या पिढीला त्यावेळेस काळानुसार बदलणारे संस्कार भेटले असते तर आता परिस्थिती वेगळी असली असती. पुढचा ठेच मागचा शहाणा, पुढचा ठेच मागचा ठेच म्हणजे मागचा महामूर्ख.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७




वाईट सवयी असलेल्या लोकांपासून काही धोका नाही जितका की वाईट स्वभावापासून. सवय ही बाहेरून आपल्या आत येते आणि स्वभाव हा आपल्या आतून बाहेर जातो. चांगल्या किंवा वाईट सवयीनसोबत चांगला स्वभाव हा चांगलाच असतो पण चांगल्या किंवा वाईट सवयींसोबत वाईट स्वभाव हा खूप घातक असतो. सवय ही जाणून बुजून केलेली कृती आहे तर स्वभाव नकळत कृती करत जातो.
कायमचे लक्ष्यात ठेवा की सवय बदलता येते, स्वभाव नाही.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




श्रीमंत आई वडील
आर्थिक आणि मानसिक दृष्टया
आपल्या पाल्यांना मदत करतात.
(अपवाद वगळता)
गरीब आई वडील
आर्थिक आणि मानसिक दृष्टया
आपल्या पाल्यांना मदत नाही करत.
(अपवाद वगळता)

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

मानसिक दृष्ट्या कमजोर माणसे कशी ओळखायची?




जे सतत एक सारखे आयुष्य जगत असतात.

टीव्ही, पेपर किंवा रस्त्यावर ऐकलेल्या बातमीची समीक्षा न करता सत्य मानून एक तर अत्यंत रंगाच्या भारत किंवा अत्यंत घाबरून प्रतिक्रिया देतात.

एक विशिष्ट विचारसरणीला न तपासता आत्मसात करतात, ज्या मध्ये फक्त भडकवण्याचे लेख लिहिलेले असतात.

आपल्या विरुद्ध विचार असलेल्यांचा मनातल्या मनात द्वेष करत असतात.

अत्यंत श्रद्धाळू असतात, घरात, पाकिटात अनेक देवांचे फोटो आणि हातात, गळ्यात अंगठ्या, तावीज असतात.

भले तो समाजात प्रतिष्ठित असला तरी त्याचे घरचे वागणे खूप वेगळे असते.

सतत पिढ्यान पिढ्या एक समूहाच्या सावलीत राहण्याचा प्रयत्न करत असतो.

बाहेर जरी तो शांत असला तरी घरी तो कुणाच्याच मताला आदर देत नाही, हुकूमशाही पद्धतीने वागत असतो.

तो एकाच्या बोलण्याला प्रतिसाद न देता प्रतिक्रिया देतो.

दुसऱ्यांवर संपूर्णपणे अवलंबून असतो. उदाहरणार्थ सरकार.

तो कधीच प्रगती करायचा प्रयत्न करत नाही आणि धोका तो पत्कारत नाही.

इतर जीवनावश्यक वस्तू ह्या एक रुपयाने जरी वाढल्या तर तो इतका आकांड तांडव करतो की ह्या अगोदर कधीच महागाई झालीच नाही. सरकार ला तो कधीच काही नाही बोलणार पण आपल्या घरच्यांना खर्च कमी करण्याचा हुकूम देईल.

आकांड तांडव ह्यासाठी पण लोक करतात ज्या मुळे त्यांचे नाकर्तेपणा झाकले जाईल व सर्व दोष सरकार व समाजाला जाईल.

काळानुसार महागाई वाढतच जाणार आहे त्यानुसार आपल्याला आपली कमाई देखील वाढवावी लागते, ह्यासाठी भूतकाळातील चुकांपासुन शिकून वर्तमानात बदल करून उज्वल भविष्य बघत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करावे लागतात हे नकारात्मक माणूस करूच शकत नाही, तो फक्त दुसऱ्यांना दोष देत बसतो.

जगातील सर्वात पहिली मनुष्य प्राण्यात गुलाम झालेला प्राणी म्हणजे स्त्री. सर्व नकारात्मक गोष्टींचे खापर स्त्रियांवर फोडले जाते, मग ती घरची बायको असो, मुलगी असो किंवा बहीण. आणि जेव्हा दुसऱ्या घरातल्या किंवा समाजातील स्त्रियांवर बोलायचे झाल्यास सगळ्या मर्यादा मोडल्या जातात.

भूतकाळातील एखादा प्रसंग सतत सांगत बसतात, न वैतागता. अपयश तर एखाद्या यश्यासारखे मिरवत सतत सांगत असतात.

स्वतःची चूक उभ्या आयुष्यात मान्य करणार नाही.

वयानुसार मिळणाऱ्या आदराला तो नकारात्मक कर्तृत्वानुसार मिळणार आदर समजतो.

मैत्री पूर्ण स्वभाव हा तर विसरूनच जा. ते संपूर्ण कुटुंब हे तणावात जगत असते.

घरी येणाऱ्या नकारात्मक लोकांची संख्या वाढत जाते.

मुलांचे एक अपयश हे एखाद्या मोक्का लागलेल्या गुन्ह्यासारखे वाटू लागते व त्यांचे प्रयत्न करणे बंद करून टाकतात.

थोडक्यात जिवंतपणी मेल्यासारखे आयुष्य जगत असतात, आणि हेच पुढच्या पिढीला लहान पणापासून संस्कार देत पुढे वारसाहक्काने ही विचारसरणी दिली जाते.


अशी अनेक उदाहरण देता येईल, माणसाने तोंड उघडले की तो काय विचार करतो हे समजून येते, काही कालावधी घालवला की त्याचा स्वभाव कळून येतो. आणि स्वभाव हा बदलू शकत नाही.

मानसिक दृष्ट्या सक्षम, सजग लोकच अश्या लोकांना ओळखून त्यांना उत्तमरीत्या टाळू किंवा हाताळू शकतात. आणि इथेच आत्मविकास कामी येतो.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




जोपर्यंत तुमचे सगळे पत्ते खेळून होत नाही तोपर्यंत
कधीच हार मानू नका.
एक महत्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवा,
तुम्ही प्रत्येकवेळेस नवीन लोकांशी खेळत जा.
हार मानने हा कधीच पर्याय नव्हता.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




वाद विवाद, चर्चा ह्यांचा उद्देश
जिंकणे किंवा हरणे नव्हे
तर प्रगती, विकास असला पाहिजे.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७




१०० % यशाचे सूत्र
ज्ञान = ५ %
कौशल्य = १५ %
यश मिळेपर्यंत कृती करत राहणे = ८० %
जॉन्ह असराफ

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




सिंह कमजोर जनावरांची शिकार करतो
आणि ताकदवर जनावरांशी सामना करतो.
तुम्ही कोन आहात?

शिकार कि प्रतिस्पर्धी?
- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




राक्षस खरे आहेत.
भूत पण खरे आहे
ते आपल्या आतच राहत असतात
आणि कधी कधी
ते जिंकतात.
- स्टीवन किंग

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




वाघाच्या विरुद्ध फक्त वाघच उभा राहतो न कि शेळी बकरी किंवा इतर जानवर,
तुम्ही कुणाविरुद्ध उभे राहतात त्यावरून तुमची लायकी कळते न कि तुमच्या विरोधकाची.

 अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक




मी स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो कारण मला तुमच्यातील सर्वश्रेष्ठतता दिसते. 

- अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

८०८०२१८७९७

आयुष्यातील संकटामुळे तुम्ही गाजर बनता, अंड बनता कि कॉफी




एकदा एक मुलगी तिच्या आयुष्यातील समस्येपासून खूप त्रस्त असते. तिच्या आयुष्यातील कठीण काळ चालू असतो जो तिच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. गेल्या काही दिसंपौस्न तिच्या आईचे लक्ष्य असते व ती ओळखते कि आपली मुलगी एका कठीण प्रसंगातून चालली आहे. आपल्या मुलीला कसे समजवायचे असे विचार करताना तिला एक कल्पना सुचते.

ती तिच्या मुलीला किचन मध्ये घेवून जाते, गॅसवर ३ पातेले पाणी टाकून गरम करायला ठेवते, पहिल्या पातेल्यामध्ये ती गाजर टाकते, दुसऱ्या पातेल्यामध्ये ती अंड टाकते आणि तिसऱ्या पातेल्यामध्ये ती कॉफी टाकते आणि पाणी उकळण्याची वाट बघत असते. तिच्या मुलीला धीर धरवत नसतो, तिला आश्चर्य वाटत असते कि आई हे काय करत आहे म्हणून.

वीस मिनिटानंतर तिची आई गॅस बंद करते. ती गाजर एका प्लेट मध्ये, अंड एका प्लेट मध्ये आणि कॉफी कपमध्ये काढते.

आई (मुलीकडे बघून) : तुला काय दिसत आहे?

मुलगी : गाजर, अंड आणि कॉफी.

आई : नीट बघ, गाजराला हात लावून बघ.
तिची मुलगी हात लावते आणि नरम झाले आहे असे सांगते.

आई : आता अंड फोड.
तिची मुलगी अंड फोडते, वरचे कवच काढते आणि बोलते कि अंड कठीण झाले आहे.

तिची आई आता कॉफी कडे बोट दाखवते आणि प्यायला सांगते. तिची मुलगी जेव्हा कॉफीचा कप तोंडाजवळ नेते तेव्हा कॉफीचा सुगंध तिला येतो, एक घोट घेतल्यावर तरतरीत करणारी चव तिला येते, व हस्यासोबत तिचा चेहरा उजळतो.

मुलगी : आई तुला नक्की मला काय सांगायचे आहे?

आई : गाजर, अंड आणि कॉफी या तिघांनी गरम पाण्याचे सारखेच संकट झेलले. तरीपण तिघांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. गाजर हे कठीण व मजबूत होते, पण संकटाच्या गरम पाण्याचा सामना केल्यावर ते नरम आणि कमजोर झाले. अंड हे आपल्या पातळ कवचा बरोबर नाजूक होते, पण जसा अंड्याचा संकटाच्या गरम पाण्याशी सामना होतो ते आतून कठीण होवून जाते. कॉफीचा विशेष गुणधर्म आहे. कॉफीने जेव्हा गरम पाण्याच्या संकटाचा सामना केला तेव्हा तिने उकळत्या पाण्याला बदलून टाकले व त्या पाण्यात सुगंध आणि स्वाद भरून नवीन पेय केले.
तू तुझ्या आयुष्यातील संकटाचा सामना करून कोण झालीस?
जेव्हा संकट तुझ्या आयुष्याचा दरवाजा वाजवत होती तेव्हा तू प्रतिक्रिया कशी देत होतीस?
तू गाजर आहेस, अंड आहेस कि कॉफी?

बोध : आयुष्यात अनेक घटना आपल्या अवती भोवती घडत असतात, काही घटना आपल्यासोबत घडत असतात, पण त्यामध्ये एकच महत्वाचे असते ते म्हणजे आपण कशी प्रतिक्रिया देतो ते आणि आपणा त्यापासून काय शिकतो. आयुष्य म्हणजे आपण तोंड दिलेल्या सगळ्या संकटापासून अनुभव, स्वीकार आणि बदल करून सकारात्मक आयुष्य घडवणे आहे.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



आठवणी आणि स्वप्नांमध्ये आपण वर्तमानातील वास्तव जीवन जगायला विसरून जातो.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

व्यवसायिक धडा १ - कावळा आणि ससा



कावळा दररोज झाडावरती काहीही न करता दिवसभर बसून असायचा.

एक लहान ससा कावळ्याला विचारतो "मी पण तुझ्यासारखा काही न करता दिवसभर बसून राहू शकतो का?"

कावळा म्हणतो "हो नक्की, का नाही?"

ससा ज्या झाडावर कावळा बसलेला असतो त्या झाडाखाली जमिनीवर बसून आराम करायला लागतो.

तेवढ्यात तिचे एक कोल्हा येतो....


सस्यावर झडप घालतो आणि त्याला खावून टाकतो.

ह्या कथेतून हा बोध घ्यायचा आहे कि जर तुम्ही बसून आहात, काही नाही करत आहात तर तुम्हाला खूप उंचावर बसावे लागेल. आजच्या भाषेत जर तुमच्याकडे पैसा आणि ताकद आहे म्हणजे तुम्ही उंचवर बसून आहात, जर तुम्ही मध्यम वर्गीय, गरीब किंवा अतिशय गरीब आहात तर तुम्ही ह्या जगामधील कोल्हा, वाघ, सिंह व अस्वल अश्या मानसिकतेचे शिकार बनू शकता.

धन्यवाद.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७




खूप मेहनत करा,
तुमचे सगळे पैसे साठवा
म्हणजे जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल
तेव्हा जे तरुण आनंद घेवू शकतात
अश्या वस्तू तुम्ही विकत घेवू शकतात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७




मला ध्येयाने झपाटलेले, वेडे झालेले लोक आवडतात
कारण मला माहित असते कि मी कुणासोबत संबंध ठेवले आहे.
जे लोक साधे आणि छान गोड वागतात त्यांच्यापासून मला भीती वाटते.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

तुम्ही कोण आहात ? गाढव 'अ' कि गाढव 'ब' ?




हि आहे दोन गाढवांची गोष्ट !
एका धोब्याकडे दोन गाढवं होती.
आपण त्यांना गाढव 'अ' आणि गाढव 'ब' असे म्हणू ....
गाढव 'अ' अतिउत्साहि होते. आपण किती काम करतो, किती मेहनती आहोत असा सतत आव आणायचं ! धोब्याने आपल्याकडे सतत लक्ष्य द्यावे, आपल्याच पाठीवर शाबासकीची थाप मारावी म्हणून सतत वेगात चालायचे. जास्तीत जास्त ओझे पाठीवर लादून घ्यायचे.
गाढव 'ब' त्या मानाने जरा भोळसटच होते. धोब्याच्या पुढे पुढे करणे त्याला काही जमायचे नाही. तशी गरजहि वाटायची नाही. धोबी आसपास असो नसो ते त्याच्याच वेगात चालायचे. शिस्तीत काम करायचे.
हळूहळू या दोन गाढवान मधला फरक धोब्याच्या लक्ष्यात यायला लागला. एक गाढवं वेगाने चालतंय. जास्तीत जास्त ओझे पाठीवर घेतय. दुसरे मात्र त्याच्या तुलनेत मागं पडतंय. धोबी 'अ' गाढवाचं कौतुक करायला लागला . 'ब' गाढवाला मात्र रट्टे बसायला लागले. त्याची सतत 'अ' शी तुलना व्हायला लागली. हि अनाठाई स्पर्धा 'ब' गाढवाला काही कळेना. शेवटी एकदिवस तो 'अ' गाढवाला भेटला. त्याला म्हणाला मित्रा येथे आपण दोघंच आहोत. उगाच कशाला एकमेकांशी स्पर्धा करायची. त्यापेक्ष्या आपण ओझे वाटून घेऊ, उगाच मरमरून धावण्या पेक्ष्या शांतपणे पुढे जाऊ. एकमेकांनाच मागे टाकण्यात कसले आलंय यश?
पण याचा परिणाम उलटाच झाला. 'अ' ला वाटायला लागल, याच्यात काही दम नाही. हा आपल्याला घाबरला. आपण पुढे जातोय म्हणून याच्या पोटात दुखतंय. आता जीरउच याची !
म्हणून 'अ' गाढव जास्त वेगाने चालायला लागले. जास्त ओझे पाठीवर घ्यायचा आटापिटा करायला लागलं.
धोबी त्याच्यावर जाम खुश होता. पण 'ब' ची धीमी गती पाहून त्याचा पारा चढायचा. त्याने 'ब' गाढवाला चोपायला सुरवात केली. 'ब' नेही आपला वेग वाढवला. पण त्याची दमछाक होत होती. इकडे 'अ' ला आणखीनच चेव चढला. 'ब' मागे पडतोय. धोबी आपल्याला शाबासकी देतोय या आनंदात ते धावत होते. धावतच होतं. गाढव 'ब' या धावण्यात पुरते खचले आणि एक दिवस कोसळले. 'ब' गाढव मेल.
'अ' बोजा उचलतोय म्हणून धोबी त्याच्या पाठीवर आता 'ब' च्या वाटेचे ओझेही ठेवायला लागला. आपण कसे थोर, 'ब' कसा पुरता संपला या नादात 'अ' च्या अंगात हत्तीचे बळ संचारले. तो उत्साह पाहून धोब्याच्या त्याच्याकडून अपेक्षाहि प्रचंड वाढल्या.
पण हे बळ फार काळ काही टिकल नाही. क्षमतेपेक्षा चौपट ओझे पाठीवर घेउन 'अ' गाढवाच्या पायातले त्राण जायला लागले. प्रयत्न करूनही त्याला आता धोब्याच्या अपेक्षे प्रमाणे काम करणे काही जमेना. धोबी संतापला. कालपर्यंत तुफान काम करणारं गाढव आता मंदावायला लागल्याने धोब्याने त्याला बदडायला सुरवात केली. मात्र जीवापाड प्रयत्न करूनही 'अ' गाढवाला पूर्वीसारखे काम होईना.
धोबी जाम वैतागला. संतापला. त्याला मार मारून दमला. शेवटी हे गाढव कामचुकार झालंय असे समजून त्याने 'अ' गाढवाची खाटिकखाण्यात रवानगी केली.
आणि नवीन गाढव विकत घ्यायला बाजारात रवाना झाला.

तात्पर्य :-

१)जगात काम करताना, करियरसाठी जीवाचं रान करून राब राब राबताना आपल्या सहकार्यांना कमी लेखू नका. ते त्यांचा कामाचा वाटा उचलत असतात, म्हनुनच तुमच्या वाट्याला तुमच्या लायकीचे काम येते हे विसरू नका. त्यांना मागे खेचायला जाल तर तुम्ही खड्यातच पडाल.

२) साहेबाच्या कितीही पुढे पुढे केलंत तरी शेवटी त्याच्या दृष्टीने तुम्ही काम काय करता. किती रिझल्ट देता हे महत्वाचं. सहकार्यांना डिवचण्यासाठी बॉसची ढाल करू नका.

३) तुम्ही 'अ' गाढव आहात का 'ब' गाढव आहात याला बॉसच्या लेखी काही किमत नाही. त्याचा लेखी तुम्ही फक्त एक 'गाढव' आहात हे विसरू नका.

४) आणि सगळ्यात महत्वाचे गाढवपणा करत ढोर मेहनत करून अनाठाई कष्ट करू नका. त्यापेक्ष्या तुमचे काम उत्तम आणि अधिक गुणवत्तेचे कसे होईल, हे बघा. तुमच्या साहेबांनाही हेच् अपेक्षीत असेल !!

"नेव्हर वर्क हार्ड, वर्क स्मार्ट..."
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७




तुमच्या कडे कितीही संसाधने का असेनात,
तुम्हाला माहितच नसेल कि कसे वापरायचे आहे.
तर ती सगळीच संसाधने तुम्हाला नेहमीच अपुरी पडतील.
अश्विनीकुमार
मी नेहमी प्रशिक्षणाच्या अगोदर चर्चा ह्या साठी करतो कि समोरच्या व्यक्तीकडे किती कल्पना आहे, किती संसाधने आहे, आहे ते सगळे बरोबर वापरले कि नाही, हे सगळे बघतो. ह्या मुळे आत्मविश्वास वाढतो, कारण आपण कितीही बरोबर असू पण जो पर्यंत तज्ञांचे मत घेत नाही तो पर्यंत आपलाच विश्वास बसत नाही आणि ह्याच चुकीच्या विश्वासातून मी लाकांना बाहेर काढतो कारण तज्ञ लोक जिथे तुम्ही कमी पडतात तिथून पुढे जाण्यास मार्गदर्शन करतात किंवा प्रशिक्षण देतात.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



धाडसी बना. धोका पत्कारा.
अनुभवला दुसरा पर्याय नाही.
पौलो कोएल्हो

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७




एकदा का तुमच्या मेंदूने नवीन आयुष्य स्वीकारले कि
परत तो जुन्या आयुष्यात परत जात नाही.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



एक चूक एकापेक्षा जास्त वेळ करत राहणे
म्हणजे ती चूक नसून तुमचा निर्णय आहे.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

सज्जन माणसांनी श्रीमंत व्ह्यायला हवे




अति पैसा दुखाचे कारण आहे. अति पैसा हाती आला कि माणूस वाया जातो. अति पैश्याची हाव वाईट मार्गाला नेते. अशा आणि अश्या अर्थाच्या कित्येक शिकवणी लक्ष्यात घेतच लहानपणापासून वाढ झाली तर पैसा हे सर्व दुखाचे मूळ कारण आहे हा समज पक्का होतो. मात्र थोडे मोठे झाले कि लक्ष्यात येते, पैशाने कुठलेही काम करता येते. मनावर झालेले संस्कार आणि प्रत्यक्ष व्यवहार यात तफावत जाणवत राहते आणि मग पैसा चांगला कि वाईट ह्या चक्रात माणूस अडकून जातो.
खर तर पैसा चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो, हे आपल्यातल्या प्रत्येकाला पटेल. कारण ज्याच्या हाती पैसा असतो तो ठरवतो पैसा कसा वापरायचा ते. पैसा भुकेल्याच्या हातात गेला तर तो त्यातून भाकरीची तजवीज करेल. पैसा गरीबाच्या हाती गेला तर तो त्या पैशालाच आणखी पैसा जोडता येईल का याचा विचार करेल. कुणा सज्जनाकडे गेला तर तो दुसऱ्याचे दुख कमी करण्यासाठी याचा वापर करेल. श्रीमंताच्या हाती गेला तर या पैशांतून अजून जास्त पैसे कसे कमावता येतील याचा विचार करेल आणि दुर्जनांच्या हाती गेला तर तो वाईट कामावर, दुसर्यांना नुकसान होईल अश्यावर खर्च करेल.
सांगायचे म्हणणे हे कि ज्या रंगात पाणी मिसळतात तो रंग पाण्याला प्राप्त होतो, तसेच ज्याचा जसा स्वभाव आणि बुद्धी त्यानुसारच ती पैश्याचा विनयोग करेल.
पण हे सारे जरी सत्य असले तरी आपण काही दुर्जन नाही. आपल्यालाही पैसा आवश्यक आहे. एका ठराविक टप्प्यावर आपल्याकडेही या पैश्यामुळे सुबत्ता येईल. त्यानंतर अतिरिक्त पैसा जमायला लागला तर आपण त्या पैशांचा उपयोग गरिबांसाठी, चांगले काम करणाऱ्यांसाठी हि करू शकतो. पण हे केव्हा तर जेव्हा आपल्या हाती पुरेसा पैसा असेल तेव्हा.
उदाहरणादाखल तुम्हाला एक गरीब माणूस भेटतो, तो अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा असतो, तो माणूस तुमच्याकडे मदत मागायला येतो पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे तुम्ही मदत करू शकत नाही. विचार करा. असे का? कारण तुम्ही फक्त तुमचाच विचार करायला सुरवात केली, तुमच्याकडे जर अतिरिक्त पैसा असता तर तुम्ही त्याला मदत करू शकला असता. म्हणजे सज्जन माणसांनी श्रीमंत व्हायला हवे, कारण तेव्हाच हि माणसे गरजवंताला मदतगार ठरू शकतील.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७




काही लोक बदलत नाहीत.
ते फक्त खोट बोलायचे नवीन रस्ते शोधून काढतात.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



बदलेल्या परिस्थितीवर ताबा मिळवा,
नाहीतर बदलेल्या परिस्थितीचे बळी पडाल.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७




स्वतःमधील कमतरता दूर करण्याची पहिली पायरी म्हणजे
आपल्या मध्ये कमतरता आहे हे स्वीकारणे होय.
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७



यशस्वी स्वप्नांना वास्तवात बदलतो,
अयशस्वी वास्तवाला स्वप्नात बदलतो.
हा जिंकण्याचा आणि हरण्याचा फरक आहे.
- अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

आर्थिक साक्षरता आणि आर्थिक अशिक्षित भारतीय नागरिक धक्कादायक सर्वे



📢📢 📢 *आपला पण 👇नंबर लागतो का?
नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. निष्कर्ष खालीलप्रमाणे अतिशय धक्कादायक होते. 👉 ६७% भारतीय हे *इंशुरंसला गुंतवणुक* समजतात. 👉सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही. 👉 *रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २%* भारतीय निघाले. 👉म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे *२२% भारतीय एसआयपी हे एका योजनेच नाव अाहे*अस समजतात. 👉अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही. 👉६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर *म्युचल फंङची पाॅलीसी घेतली* अस म्हणतात. ते म्युचल फंङ म्हणजे इंशुरंस मधिलच एक पाॅलीसीसारखा प्रकार अाहे अस समजतात. 👉 *टॅॅक्स फ्री हा बाॅंङ ८०c प्रमाणे सवलत देतो अस माननारे ७६%* भारतीय अाढळुन आले. 👉 *९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात. जे ०८ % लोक निवृत्तीजीवनासाठी तरतुद करतात त्यातील ६१% लोकांनी निवृत्तीसाठी इंशुरंस पाॅलीसीची निवङ केली आहे ज्यात परतावा ४.५% पेक्षाही कमी असतो.* 👉संपुर्ण *फायनान्शियल प्लॅनिंग करणार्‍या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी* आढळुन आली. 👉फक्त *भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात*.जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हाॅस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही.इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे. 👉भारतात *साधारण विमा घेणार्‍यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले*.एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असुन ती ८५ लाख करोङ इतक्या मोठ्या निधीचे व्यवस्थापन पाहते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष २४ लाख लोकांना एलआयसी कङुन रोजगार मिळतो. *आपल्या गुंतवणुकदारांना ४-५% परतावा देणारी एलआयसी ही भारतातील शेअरबाजारात गुंतवणुक करणारी सर्वात मोठी संस्थागत गुंतवणुकदार आहे* . पोस्टल लाईफ घेणार्‍याची संख्या त्या खालोखाल आहे. तिचा परतावा जवळपास ६% इतका आहे. 👉भारतातील *म्युचल फंङ इंङस्ट्री ही चागंली पारदर्शक असुन व सेबी ही उत्तम नियंञक असली तरी भारतातील फक्त ३% लोकच यात गुंतवणुक करतात*.म्युचल फंङ *वितरकांचा प्रचंङ अभाव याच प्रमुख कारण असुन त्याची संख्या संपुर्ण भारतभरात फक्त १.१० लाख इतकीच आहे. त्यातील फक्त २४००० प्रत्यक्ष काम करताना आढळतात.* त्यांची वाढ व्हावी यासाठी बाजाराची नियंञक सेबी कुठलही पाऊल उचलत नाही.शिवाय त्यांना मोकळेपणाने काम करण्याच स्वातंञ नाही. म्युचल फंङ मध्ये एकुण गुंतवणुक ही १४.५ लाख करोङ रु. इतकी आहे. 👉५४ ईसी बाॅंङ, इंफ्रा बाॅंङ, पीएमएस, काॅर्पोरेट एफङी इ. फायनान्शियल प्राॅङक्टबद्दल फक्त ९% भारतीयांना माहिती आहेत. 👉 *भारतीय शेअरबाजार हा जगातील जुन्या शेअरबाजारापैकी एक असुनही फक्त ४% लोकच शेअरबाजारात गुंतवणुक करतात. गेल्या ३७ वर्षात तब्बल १५.६८% इतका परतावा सातत्याने देवुनही बहुतांश भारतीय लोक याला सट्टा किंवा जुगार मानतात* . भारतातील लोकांपेक्षा परदेशी गुंतवणुकदार येथे जास्त प्रमाणात गुंतवणुक करताना आढळतात. शेअरबाजारात गुंतवणुक ही संस्कृती रुजवण्यात सरकार व नियंञक सेबी सपशेल अपयशी ठरले आहेत अस मत सर्वे करणार्‍या तज्ञांनी माङंले.
आर्थिक साक्षर व्हा 🙏🏻
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७



एका न्यूज च्या वेब साईटवर सोनी आयपीएल दाखवणाऱ्या सोनी या कंपनीची कमाई १२०० कोटी झाली आहे, त्यासाठी सोनी या कंपनीला गुंतवणूक काही शे कोटी गुंतवणूक करावी लागली, आणि सोनी चॅनेल वर जाहिराती दाखवून इतर कंपन्यांनी कमावलेले कोट्यावधी रुपये वेगळे. आता ह्यामध्ये कमावणारे खूप कमी लोक असतात व प्रेक्षक वर्ग हा खूप मोठा ग्राहक असतो. तुलना करायची झाल्यास ५० करोडोंचा नफा कमावणाऱ्या लोकांच्या तुलनेत करोडोंचा ग्राहक प्रेक्षक वर्ग.
उद्योजकीय मानसिकता असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना एकच विनंती आहे कि ह्या हजारो कोटींच्या नफ्यामध्ये आपली जागा नक्की करा, आपण करोडोंच्या नफ्याचा उद्योग, व्यवसायाचा आयपीएल खेळू, हजारांची, लाखांची मर्यादा मन, मेंदू आणि विचारातून काढून टाका, २, ४ वर्ष योजना बनवण्यात द्या, अमलात आना, ९९ अयशस्वी योजनांपैकी १ यशस्वी योजना पुढे न्या.
अपयशी होताना हि असे अपयशी व्हा कि जोरात आवाज आला पाहिजे आणि आकाशातील लोकांनी खाली येवून मदतीचा हात दिला पाहिजे.
आयपीएल सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे जिला जिवंत करोडो सामान्य लोक ठेवतात आणि अंडी हि काही ५०, ६० लोक घेवून जातात, आणि ह्याच लोकांमध्ये आपला ६१ वा नंबर लावा.
धन्यवाद

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७

बेरोजगार युवती, नाकारलेली नोकरी आणि निर्माण केलेली उद्योगाची संधी

बेरोजगार युवती, नाकारलेली नोकरी आणि निर्माण केलेली उद्योगाची संधी
एकदा बेरोजगार युवतीने साफ सफाई च्या कामासाठी मायक्रोसॉफ्ट मध्ये अर्ज केलेला असतो. तिथे तिची कामासंदर्भात परीक्षा चालू असते, मुलाखत घेणारा तिची साफ सफाई करणे नीट बघत असतो.
मुलाखत घेणारा : आपली निवड करण्यात आली आहे. तुम्ही मला तुमचा इमैल द्या, तुम्हाला एक फॉर्म भरण्यासाठी पाठवून देतो.
बेरोजगार युवती : माझ्याकडे संगणक नाही आहे आणि इमैल हि नाही आहे.
मुलाखत घेणारा : मला माफ करा, जर आपल्याकडे इमैल नाही तर आपले अस्तित्वच नाही आहे. आणि ज्याचे अस्तित्व नाही आहे त्याच्यासाठी आमच्याकडे काम नाही आहे.

बेरोजगार युवती मुलाखत घेनाऱ्या कडून व त्या मोठ्या कंपनीकडून काही आशा न ठेवता निघून जातो.

तिच्या कडे असलेल्या फक्त ३०० रुपयांचे काय करायचे ते माहित नसते. मग ती बाजारात जायचे ठरवते, व १० किलो टमाटे विकत घेते. घरो गरि जावून ती टमाटे विकते. दोन तासांपेक्षा पण कमी वेळेत ती तिचे भांडवल दुप्पट करण्यात यशस्वी होते. हीच संकल्पना ती ४ वेळेस परत करते,

१२०० रुपयांच्या नफ्यासोबत ती घरी परतते. त्या युवतीला समजते कि ह्या मार्गाने ती कमवू व जगू शकते, मग प्रत्येक दिवशी लवकर घरातून निघते आणि उशिरा घरी येते. प्रत्येक दिवशी तिचे पैसे दुप्पट, तिप्पट होत जातात. काही कालावधीने ती हातगाडी घेते, नंतर मालवाहू रिक्षा घेते, नंतर ट्रक घेते, आता तिच्याकडे माल वाहन करणाऱ्या गाड्यांचा ताफा असतो. ५ वर्षानंतर ती युवती हि भारतातील सर्वात मोठ्या अन्न धान्य विक्रेत्यापैकी एक होते.

ती आपल्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल योजना करत असते आणि जीवन विमा पॉलिसी काढायचे ठरवते. ती एका विमा विक्रेत्याला बोलावते आणि एक संरक्षण जीवन विमा निवडते. संभाषणाच्या शेवटी विमा विक्रेता तिला तिचा इमैल आयडी मागतो.
युवती : माझ्याकडे इमैल आयडी नाही आहे.
विमा विक्रेता (कुतुहलाने) : आपल्याकडे इमैल आयडी नसून सुद्धा इतके मोठे उद्योगाचे साम्राज्य उभे केले. तुम्ही कधी कल्पना केली का जर तुमच्या कडे इमैल आयडी असला असता तर तुम्ही कुठपर्यंत पोहचला असता ते?

त्या युवतीने थोडा विचार केला आणि उत्तर दिले कि
"हो, मी आता पर्यंत मायक्रोसॉफ्ट मध्ये साफ सफाईचे काम करत बसले असते!"

कथेचा सारांश:
१) इंटरनेट, इमैल, बिबिम, व्हास्टएप, हे तुमच्या आयुष्याचे उपाय किंवा समाधान नाही आहेत.

२) जर तुमच्या कडे फेसबुक अकाउंट, इंटरनेट, इमैल, बिबिम, व्हास्टएप नसेल आणि हुशारीने, मेहनतीने उद्योग किंवा व्यवसाय केलात तर तुम्ही पण करोडपती बनू शकता.

नेहमी एक लक्ष्यात ठेवा कि माणसाने ह्या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत, मग जी गोष्ट एका माणसाने निर्माण केली आहे तीच गोष्ट जर दुसऱ्या माणसाला येत नसेल तर तो कमी कसा ठरेल?

अश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७