आपल्या आयुष्यात मानसिक व शारीरिक आरोग्याला व रुपयांना सर्वात वरचे स्थान देणे किती गरजेचे आहे हे खालील उदाहरणावरून समजेल,
काल स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले हॉस्पिटल चे बिल
ICU चा फक्त गोळ्यांचा खर्च दिवसाला २०,००० (वीस हजार)ते २५,००० (पंचवीस हजार) रुपये
एकूण फक्त गोळ्यांवर खर्च झालेली रक्कम १,५०,००० (दीड लाख)रुपये
संपूर्ण उपचाराचा खर्च ७,००,००० (सात लाख) ते ८,००,००० (आठ लाख) च्या घरात.
इमानदारीने इतके पैसे उभे करणे शक्यच नाही, जर खानदानी श्रीमंत किंवा अगोदर पासून आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर काही समस्या नाही, माणूसएका झटक्यात गरीब होतो, मानसिक त्रास तो वेगळा. हे माझ्या समोर घडणाऱ्या काही प्र्संगापैकी एक, मग विचार करा किती लोक जे आपल्या संपर्कात येतच नाही ते पैसे नसल्यामुळे स्वतःचा, घरच्यांचा जीव जात असताना बघत असतील त्यांची काय परिस्थिती असेल, हे मी सांगतो ते काल्पनिक कथा नाही आहे, ज्याला अनुभव येतो किंवा जो ह्या अनुभवातून जात असतो त्यालाच वास्तव माहित असते.
डॉक्टर हा उच्च शिक्षित आणि समाजातील आदरणीय, प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व समजले जातेपण जो माणूस ह्या सगळ्या परिस्थितीतून जातो त्यालाच डॉक्टरांचे खरे रूप दिसून येते. कुठल्याही पदवीने माणसाला शहाणपण येत नाही, जर स्वभावाने चांगला माणूस असेल आणि तो डॉक्टर असेल तर तो स्वभावाने चांगलाच राहणार, आणि जर स्वभावाने वाईट असेल तर तोच गुण त्याच्या पेश्यामध्ये दिसून येईल.
तुमच्या पेक्षा जास्त पदवीधर आणि उच्च पदवीधरांचा अनुभव खरेच माणुसकीसाठी समाजसेवा करणाऱ्या लोकांनी घेतले आहे, जरा त्यांचे अनुभव ऐका नाहीतर एक महिना फिरा त्यांच्यासोबत, अक्षरक्ष तुमच्या अंगावर शहारा येईल असे अनुभव येतील.
ह्याच मध्ये तुम्हाला माणुसकीची जान असणारे पदवीधर आणि उच्च शिक्षित पण भेटतील, जे अक्षरक्ष देवापेक्षा मोठे वाटतील तुम्हाला असे अनुभव पण येतील.
म्हणून मी सतत बोलत असतो कि खरे शिक्षण शाळा, विद्यापीठ आणि घराबाहेर सुरु होते. जो कमी वयात अनुभव घेतो तो आयुष्य उत्तम जगू शकतो, जो असे अनुभव उशिरा घेतो तो मानसिक तणावात जातो, कारण लहानपणात मनुष्य लवकर शिकतो, त्याच्या मेंदूची वाढ होत असते, मोठे होई पर्यंत आपल्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते व एक प्रकारे खूप नकारात्मक गोष्टींची सवय झालेली असते, ती एका झटक्यात बदलणे शक्य नाही.
वीस वर्षांपूर्वी लावलेले वडाचे रोपटे आता मोठे झाड झालेले असते, रोपटे एका हाताने आरामात उखडून टाकू शकता, पण इतके मोठे झाड तुमच्या हातात पण येणार नाही आणि उखडून टाकण्याची तर दूरची गोष्ट.
जगात सर्वकाही चांगलच आहे आणि चांगलच झाले पाहिजे म्हणजे तुम्ही भ्रमात आहत व मानसिक दृष्ट्या कमजोर आहात, जगात सर्वकाही वाईटच आहे आणि वाईटच झाले पाहिजे म्हणजे तुम्ही भ्रमात आहत व मानसिक दृष्ट्या कमजोर आहात, जग चांगल पण आहे आणि वाईट पण आहे, ह्या दोन्ही गोष्टी होतच राहणार, येणाऱ्या वेळ प्रसंगांना बघून मला तोंड देत अनुभवत मिळवत जगावे लागणार आहे, म्हणजे तुम्ही हुशार आहात आणि मानसिक दृष्ट्य सक्षम आहात.
वाचा, विचार करा, निर्णय तुमचा आहे, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे कि लाचारासारखे आयुष्य जगायचे. तुम्ही जर काळानुसार चाललात तर तुम्ही टिकाल, जर नाही चाललात तर संपून जाल.
तुमच्या आर्थिक उन्नती साठी आजच संपर्क करा, जर वर्तमान बदलला नाही तर तो पुढे जाऊन भविष्यकाळ होणार आहे. तुमचे आणि तुमच्या मुलांचे भविष्य सर्वांगीण विकासाचे, श्रीमंतीचे आणि समृद्धीचे करायचे आहे कि अंधारमय करायचे आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार