गुंतवणूकदार बना व भविष्य उज्वल करा



गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीचा विचार करावा, जर आज महागाई १५ % असेल तर २० वर्षांनी किती असेल ह्याचा अंदाज तुम्ही सरकारी आकड्यानुसार घेवू शकता, व ज्या गतीने किंवा पटीने महागाई वाढत असेल त्यानुसार आपली गुंतवणूक सुद्धा वाढली पाहिजे. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत, आणि सगळे समजायला सोपे आहे, ह्यासाठी प्रत्येक माणूस हा आर्थिक बाबतीत सुशिक्षित असला पाहिजे. त्या मध्ये जास्त खोलात जायचे नसते, फक्त जेव्हा आपली गुंतवणूक आपल्याला पाहिजे त्या टक्क्यापर्यंत किंवा सरासरी टक्क्यांपर्यंत निकाल देत नसेल तेव्हा थोडे फेरफार करून तो टक्का आपण वधारू शकतो.

गुंतवणूक करण्यासाठी ज्ञानापेक्षा भावनांवर ताबा हा खूप महत्वाचा असतो. अनेक लोक हे ज्ञान नसतानादेखील उत्तम गुंतवणूक करतात पण त्यांचा त्यांच्या भावनांवर ताबा नसतो त्यामुळे त्यांची गुंतवणूक चुकते आणि अश्या वेळेस आमच्यासारख्या तज्ञ लोकांची मदत घेतलेली नेहमी बरी कारण आम्ही वेळीच उपचार केले म्हणून एकतर तोटा जास्त होण्याचे प्रमाण कमी होते किंवा नफा मिळण्यास सुरवात होते पण जर तुम्ही सगळेच गमावून नंतर तज्ञ लोकांची मदत घ्यायचा प्रयत्न केला तर जगातील कितीही विद्वान असू देत, कुणीही काही करू शकत नाही म्हणून हुशार बना, वर्तमानात पूर्ण जगताना भविष्य पण सुखकर करून टाका.

पहला कदम हा टीव्ही वरील कार्यक्रम बघत जा, झी वरील तज्ञ राजेश तांबे यांचा पासवर्ड श्रीमंतीचा कार्यक्रम बघत जा, माझावरील कार्यक्रम मराठी बिग बोस हा उद्योगपतींच्या मुलाखतीचा कार्यक्रम बघत जा ह्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल. विचार बदलेल तेव्हा कृती बदलेल, कृती बदलेल तेव्हा सवय बदलेल, सवय बदलेल तेव्हा स्वभाव बदलेल आणि जेव्हा स्वभाव बदलेल तेव्हा भाग्य बदलेल आणि हेच आर्थिक शिक्षण आपल्या मुलांना लहानपणापासून द्या व त्यांचे भविष्य उज्वल करून टाका. धन्यवाद. अश्विनीकुमार ८०८०२१८७९७ चला उद्योजक घडवूया समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार