जस जसे वर्ष पुढे चालले होते आणि मुल वयाने मोठी होत होती त्यावेळेस संशोधक मुलांच्या आयुष्यातील विविध भागांवर लक्ष्य ठेवून होते. त्यांना जे सापडले ते आश्चर्यजनक होते.
ज्या मुलांनी धीर धरला होता आणि त्यामुळे त्यांना अजून एक गुलाब जाम भेटला होता त्यांचा SAT स्कोर जास्त होता, जास्तीत जास्त सदाचाराने, नम्रतेने वागत होते, शरीराने जाड होण्याचे प्रमाण कमी होते, तणावाला उत्तम प्रकारे हाताळत होते, सामाजिक कौशल्य उत्तम होते असे त्यांचे पालक म्हणत होते, आणि आयुष्यःच्या बाकीच्या भागातही त्यांचे गुण उत्तम होते. (संशोधनाच्या अधिक माहितीसाठी क्रमांक एक, दोन व तीन वर क्लिक करा)
संशोधक मुलांचा सतत ४० वर्षे पाठपुरवठा करत होते, कसेही वातावरण किंवा परिस्थिती असू द्यात जी मुल दुसऱ्या गुलाब जाम साठी धीर धरत, स्वतःवर ताबा ठेवून वाट बघत थांबली होती ती त्या वातावरणात, परिस्थितीत यशस्वी झाली होती. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर जी मुल धीर धरू शकत होती ती आयुष्यात यशस्वी झाली होती. म्हणून जो धीर धरू शकतो तो जग जिंकू शकतो.
आता आपल्याला ठरवायचे आहे आल्या मुलांना कसे संस्कार द्यायचे ते, त्यासाठी आपल्याला ते संस्कार आपल्या मध्ये बिंबवावे लागेल.
अश्विनीकुमार फुलझेले
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
८०८०२१८७९७
solution.nirvana@gmail.com
0 आपले विचार