आसाममधील एका तीसरी पास तरूणाने चक्क स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे. वेल्डींगचा व्यवसाय करणाऱ्या सागर प्रसाद शर्मा याने आपल्या गावातील घरासमोर असणाऱ्या खोलीत हे हॅलिकॉप्टर तयार करून अनेकांना धक्का दिला.

भारतात प्रतिभा आहे. गरज आहे ती फक्त ओळखण्याची व सादर करण्याची. मॅकडोनाल्ड बर्गर विकतो तो काही जगातील सगळ्यात चविष्ट खाण्याचा पदार्थ नाही आहे, त्यापेक्षा आपल्या गल्लीमधील वडापाव, भजीपाव, मिसळ, झुणका भाकर असे कितीतरी भारतीय महाराष्ट्रीय चविष्ट पदार्थ आहे, ते तुम्ही कसे सादर करतात, जगामधील कितीतरी चविष्ट पदार्थ असतील पण तुम्हाला फक्त तुमचाच पदार्थ कसा चविष्ट आहे हे सांगण्याची, त्यासाठी तुम्हाला डिस्कवरी व इतर सायन्स वरील टीव्ही चॅनेल जे अमेरिकन व युरोपिअन लोकांच्या मालकीचे आहेत ते बघावे लागेल. भले त्यांची संस्कृती असू दे, तिकडचे उद्योगपती, चित्रकार, खाण्याचे पदार्थ, संशोधक किंवा रस्त्य्वरील एक साधा दगड ह्या सगळ्या बद्दल ते असे सांगतात कि संपूर्ण मानवजातीत तेच सर्वश्रेष्ठ आहे. मला आशा आहे कि कोणीतरी महाराष्ट्रातून मराठी उद्योजक किंवा गुंतवणूकदार आसाम च्या ह्या आपल्या भारतीय बंधूला मदत करेन.
- अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार