धाडस दाखवणे = धोका पत्करणे 

म्हणजे आपण जे करत आलो आहोत किंवा पारंपारिक रित्या जे करत आहेत त्यापेक्षा वेगळे करणे हे होय. जर एखाद्याला उद्योग करायचा असेल तर त्याला पैसे उभे करावे लागतील त्यासाठी धाडस दाखवून घरच्या मंडळींना आपली कल्पना पटवून देवून त्यांच्या कडून उद्योगासाठी निधी उभा करावा लागेल. जर जास्त निधी लागत असेल तर सरकारी व खाजगी संस्थांना भेटी देवून त्यांना आपला प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवून त्यांना पैसे देण्यासाठी तयर करावे लागेल हे देखील धाडसी काम आहे. ज्या कोणी नोकरी करणारे आहे त्यांचे स्वप्न असेल कि स्वतःचा उद्योग सुरु करावा ह्यासाठी अगोदर त्यांना नोकरी सोडावी लागेल व आपल्या सुरक्षीत व रटाळ आयुष्यातून बाहेर पडावे लागेल ह्यालाही धाडस लागते म्हणजेच धोका पत्करावा लागतो. धाडस ह्या शब्दाचा अर्थ हा तुम्हाला फक्त कृतीतून समजेल.

विचार काय करत आहात, दाखवा धाडस आणि घ्या आपल्या आयुष्याचा रथाचा लगाम आपल्या हातात.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार