उद्योजकीय, व्यवसायिक व धाडसी लोकांसाठी सुवर्णसंधी १४ फेब्रुवारी वेलेनटाइन डे ह्या प्रेमाच्या दिवशी व्यवसायिक किंवा सामाजिक इव्हेंट म्हणजेच कार्यक्रम आयोजित करू शकता. ह्यामध्ये २ प्रकार आहेत, पहिला व्यावसायिक जिथे अनुभवी व्यावसायिक नफा कमवू शकतात आणि नवीन विना अनुभवी व्यासायिक अनुभव मिळवू शकतो. काही जुनी समजुती काढून टाका म्हणजे फक्त प्रेमी युगुलच हा प्रेमाचा दिवस साजरा करू शकतो, हि शुद्ध मूर्खपनाची समजूत आहे. काहींचे प्रेम आपल्या कुटुंबांवर असते, काही आपल्या मित्रांवर प्रेम करतात, काही समाजावर प्रेम करतात, सैनिक हा देशावर प्रेम करतो, काही अनाथ मुलंवर प्रेम करतात तर काही गरिबांवर, असे प्रेमाचे अनेक पैलू आहेत. व्यवसायिक पद्धतीने कार्यक्रम आयोजित करा तिथे तुम्हाला नाव आणि नफा दोन्ही भेटेल, सामाजिक पद्धतीने आयोजित करा जिथे तुम्हाला जिथे तुम्हाला ना नफा ना तोटा किंवा स्वतःचे पूर्ण योगदान देवून तुम्हाला मनाची शांती, समाजाचे देणे, प्रसिद्धी जी व्यवसायासाठी खूप उपयुक्त असते व नवे संपर्क भेटतील. करा कल्पना, करा कृती, करा काहीतरी नवीन आणि झेप घ्या तुमच्या स्वप्नांच्या दिशेने.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार