तुमचा जसा विश्वास असतो आणि त्यामुळे तुम्ही जसा दिवसभर विचार करता तसेच आयुष्य तुम्ही जगत असता.
तुमचा जर विश्वास असेल कि खूप मेहनत करणारा उद्योजक बनू शकतो किंवा असतो तर तसेच घडेल, जेव्हा पण तुम्ही उद्योग सुरु कराल तेव्हा तुम्हाला तशीच परिस्थिती येईल जेणेकरून तुम्हाला अतिशय कठीण परिश्रम करून, दिवस रात्र मेहनत करून उद्योग सांभाळावा लागेल. जर तुमचा विश्वास असेल कि उद्योग करणे खूप सोपे आहे, मजेशीर आहे तर तुम्हाला तश्याच परिस्थितीला सामोरे जावे लागेल. विश्वास हा कुठे दुकानात भेटत नाही, दुसरा कोणी तुमच्या मनात निर्माण करू शकत नाही. काहींमध्ये तो जन्मजात असतो, काहींना घरातून, नातेवाईक किंवा मित्रांकडून भेटतो व काही स्वतः किंवा परिस्थितीला सामोरे जावून विश्वास निर्माण करतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले स्वप्नाचे आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल करा. निर्णय तुमचा आहे, आयुष्य तुमच आणि जबाबदार पण तुम्हीच.

- अश्विनीकुमार


८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार