लेखक अश्विनीकुमार. उद्योग व्यवसाय गुंतवणूक सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण आणि कायदेशीर मदत. मानसिक विकास - संमोहन, आकर्षणाचा सिद्धांत, ध्यान. अध्यात्मिक विकास - ध्यान साधना, मंत्र साधना, जप, उपाय. अघोरी विकास - तंत्र साधना, मंत्र साधना, उपाय. वास्तू - वास्तू उर्जा शास्त्र (सर्व प्रकारच्या वास्तू). उर्जा शास्त्र - वास्तू उर्जा शास्त्र, शारीरिक उर्जा शास्त्र, रेकी हिलिंग. स्पर्शन चीकीस्ता.
ज्यांना उद्योग सुरु करायचा आहे किंवा जे नवीन उद्योजक आहेत त्यांना वाटते कि "अनुभवी उद्योजकांना नवीन उद्योजकांपेक्षा उद्योगातील व आयुष्यातील अपयशांची व अडचणींची कमी भीती वाटते", हे शुद्ध खोटे आहे, अनुभवी उद्योजक जास्त घाबरलेले असतात कारण त्यांनी आयुष्यतील प्रत्येक अपयश, अडचणी ह्यांना तोंड दिलेले असते, त्यांना हे पक्के माहित असते कि कुठचा उद्योग हा तारणार आहे कि डुबणार आहे, कुठचा गुंतवणूकदार अजून गुंतवणूक करणार आहे कि गुंतवणूक काढून टाकणार आहे, कोण कोर्टाचे उंबरठे झिजवायला लावणार आहे, कोण घरचा किंवा जवळचा मदत करणार आहे कि धोका देणार आहे, आपला परिवार आपल्या सोबत आहे कि साथ सोडून देणार आहे, कोण जगणार आहे कि मरणार आहे ह्या सगळ्या भावनिक वादळातून ते गेलेले असतात, काही वादळ त्यांच्या जीवावर बेतलेले असतात ह्या मुळे ते अपयश, अडचणी व मृत्यूच्या भीतीचा सामना करू शकतात व त्यावर मात करू शकतात. अनुभवी उद्योजकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेले असतात म्हणून ते नवीन उद्योजकांपेक्षा जास्त घाबरलेले असतात.
0 आपले विचार