उद्योजकीय किंवा व्यवसायिक मानसिकतेची लोक कधीच आपण काय शिकलो, कसली पदवी आहे किंवा उच्च शिक्षित आहे ह्याचा ते विचार नाही करत. ते अनुभवातून आपले निर्णय घेतात, ह्यांना १८ वर्षांची किंवा ५८ वर्षांची वयोमर्यादा नसते, ते धाडस दाखवायला घाबरत नाही, वेळप्रसंगी कमी शिक्षित एखाद्या पंचतारांकित हॉटेल मध्ये पण उद्योग करायला जातो, आणि उच्च शिक्षित रस्त्यावर आपल्या व्यवसाय चालू करतो.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

वास्तविक आयुष्यात तुमचे शालेय प्रगती पुस्तक, विद्यालयी व उच्च विद्यालयीन पदवी, शैक्षणिक क्षेत्रात भेटलेली सुवर्ण, रौप्य, चांदीची पदके हि परिस्थितीनुसार रद्दी, भेळवाला व सराफाकडे दिसतात. तुमचे स्वप्न, तुमचा स्वभाव, तुमची इच्छा शक्ती, तुमचा व्यवहार, वेळप्रसंगी दिलेला मदतीचा हात, तुम्ही गुंतवणूक करून केलेली देशाची मदत, उद्योग किंवा व्यवसाय उभा करून, वाढवून, १०० लोकांना रोजगार देवून केलेली समाजसेवा ह्यांची प्रगती पुस्तके, पदव्या व पदके हे माणसांच्या हृदयात, डोळ्यात समाजात दिसून येतात जे कोणी काढू शकत नाही किंवा विकूही शकत नाही.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

ज्यांना उद्योग सुरु करायचा आहे किंवा जे नवीन उद्योजक आहेत त्यांना वाटते कि "अनुभवी उद्योजकांना नवीन उद्योजकांपेक्षा उद्योगातील व आयुष्यातील अपयशांची व अडचणींची कमी भीती वाटते", हे शुद्ध खोटे आहे, अनुभवी उद्योजक जास्त घाबरलेले असतात कारण त्यांनी आयुष्यतील प्रत्येक अपयश, अडचणी ह्यांना तोंड दिलेले असते, त्यांना हे पक्के माहित असते कि कुठचा उद्योग हा तारणार आहे कि डुबणार आहे, कुठचा गुंतवणूकदार अजून गुंतवणूक करणार आहे कि गुंतवणूक काढून टाकणार आहे, कोण कोर्टाचे उंबरठे झिजवायला लावणार आहे, कोण घरचा किंवा जवळचा मदत करणार आहे कि धोका देणार आहे, आपला परिवार आपल्या सोबत आहे कि साथ सोडून देणार आहे, कोण जगणार आहे कि मरणार आहे ह्या सगळ्या भावनिक वादळातून ते गेलेले असतात, काही वादळ त्यांच्या जीवावर बेतलेले असतात ह्या मुळे ते अपयश, अडचणी व मृत्यूच्या भीतीचा सामना करू शकतात व त्यावर मात करू शकतात. अनुभवी उद्योजकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेले असतात म्हणून ते नवीन उद्योजकांपेक्षा जास्त घाबरलेले असतात.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

स्त्रीशक्ती

मी भाग्यशाली नाही आहे पण मी माझे भाग्य स्वतः बनवते.
कारण आपले भाग्य हे आपल्या मनात, मेंदूत व हातात आहे.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


मी भाग्यशाली नाही आहे पण 
मी माझे भाग्य स्वतः बनवतो.
कारण आपले भाग्य हे आपल्या
मनात, मेंदूत व हातात आहे. 

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


ज्यांना उद्योगाची सुरवात करायची आहे किंवा सूश्म व लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी आणि एक आनंदाची बातमी आहे. सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना त्यांचा माल थेट कुणाच्या मध्यस्थीशिवाय बाजारात विकायची परवानगी दिली आहे ज्यामुळे बाजारात असंख्य ऑनलाइन व ऑफलाइन उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, फक्त उद्योजकीय आणि व्यवहारिक दृष्टीकोन पाहिजे. जे नोकरीला आहेत पण काही कारणास्तव नोकरी सोडून उद्योग करू शकत नाही, असे आपले मित्र मंडळी गुंतवणूकदार म्हणून आपली भूमिका निभावू शकतात.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

आपण कुठे आहात, आपल्याला कुठे असायला पाहिजे, फक्त तुम्हाला झेप विश्वासाची घ्यायची आहे, विचार काय कर आहात? "उडी मारा". पार झालात तर तुम्ह्च्या स्वप्नांचे आयुष्य तुम्ही वास्तवात जगाल आणि पडलात तर परत दरी चढून या व प्रयत्न करा. हेच वास्तविक आयुष्य आहे. वादळ आल्यावर सगळे पक्षी हे लपून बसण्यासाठी आसरा शोधतात, पण गरुड हा वाढली ढगांच्या वारू उडत असतो.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


जगातील आर्थिक मंदी म्हणजे काही मोठ्या उद्योगपतींनी कृत्रिमरीत्या निर्माण केलेली मंदी. हे समजायला मानवजातीच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत असेल तर त्या मंदीचा काडीमात्रहि फरक पडत नाही, पण ह्या साठी साम, दाम, दंड, भेद वापरावे लागतात कारण समोरचे पश्चिमेकडील देश हजारो वर्षांपासून करत आलेले आहेत. त्यांची जडणघडण व्यापाराच्या नावाने संपूर्ण जगावर राज्य करायची राहिली आहे. जहाजामधील एक छिद्र संपूर्ण जहाज बुडवू शकते, त्यामुळे आपले जहाज मजबूत ठेवा.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


जगामध्ये १८२६ अब्जाधीश आहेत.
त्यापैकी ६५ % अब्जाधीश स्वत: च्या 
प्रयत्नांनी पुढे आलेले आहेत.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


यशस्वी होणे हे कठीण आहे,
पण गरीब राहणे हे त्यापेक्षा
कितीतरी पटीने कठीण आहे.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


जंगलाची अर्थव्यवस्था कशीही असू देत,
तुम्हाला कधीही सिंह हा गवत खाताना दिसणार नाही.
त्याचा हा गर्व नाही आहे, तो कोण आहे हे दाखवतो.
आपल्या कृतीवर लक्ष्य ठेवा.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


लोकांची इमानदारी 
मोजण्यासाठी रुपये 
हे उत्तम मोजमापक आहे.
रुपये आपला खरा 
चेहरा दाखवून देते.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


जीवनातील सत्य

जेव्हा लहान मुल चालायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याला प्रोस्ताहन देतो.

जेव्हा तेच मुल (मुलगा किंवा मुलगी) मोठे झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे
राहण्यासाठी उद्योग धंदा चालू करण्याचे बोलतो तेव्हा त्याला किंवा तिला
प्रोस्ताहन न देता त्यांचे मानसिक खच्चीकरन केले जाते.

तुम्ही तुमचे वागणे तपासून बघा, लहान मुलांसोबत कसे वागतात आणि
तरुण किंवा वयाने मोठे यांच्यासोबत कसे वागतात ते.जर आपल्या
वागण्यात फरक असेल तर आपल्यात दोष आहे नाही कि त्यांच्या.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


स्वप्न हे लहान 
मुलांसारखे असते,
तुम्हाला त्याचे बोट 
पकडून ठेवावे लागते,
लक्ष्य ठेवावे लागते, 
नाहीतर ते हरवून जाईल

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

अपयशांची शृंखला
हरलेल्यांना
पराभूत करते,
पण हीच शृंखला
विजेत्यांना
प्रोस्ताहित करते.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



मला ९९ समस्या आहेत,
माझ्या मालकाला एकही नाही.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


स्वतः मध्ये केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही.
- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



आपल्या बालपणातील स्वप्न कधीच सोडून नका देऊ.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


कधी कधी तुम्हाला प्रोस्ताहन शोधावे लागते,
कधी कधी प्रोस्ताहन स्वतः तुम्हाला शोधत येते.

- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


शास्त्रज्ञानच्या संशोधनानुसार मुलं गर्भापासून ते ७ वर्षांची होईपर्यंत त्यांच्यावर जसे संस्कार आई वडील, कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज किंवा परिसर करतो तोच त्याचा आयुष्यभरासाठी मूळ स्वभाव होवून जातो व तसेच आयुष्य जगायला लागतो. ७ वर्षानंतर फक्त २ % लोकांच्या आयुष्यात बदल घडतो त्यासाठी त्यांना चांगल्या वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागते, बाकी ९८ % तसेच आयुष्य जगत असतात म्हणून आपल्या मुलांवर उत्तम गर्भसंस्कार करा, त्यांना घरात बाहेर समाजात उत्तम वातावरण द्या जेणेकरून आपल्या पिढ्या आनंदात जगतील, संकटाशी दोन हात करून परत उभे राहू शकतील. हि जबाबदारी जेवढी आई वडिलाची आहे तेवढीच समाजाची म्हणजेच आपल्या सर्वांची आहे. विचार तुमचा, आयुष्य तुमच, घडवणारे तुम्ही आणि जबाबदार पण तुम्हीच.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


तुमचा जसा विश्वास असतो आणि त्यामुळे तुम्ही जसा दिवसभर विचार करता तसेच आयुष्य तुम्ही जगत असता.
तुमचा जर विश्वास असेल कि खूप मेहनत करणारा उद्योजक बनू शकतो किंवा असतो तर तसेच घडेल, जेव्हा पण तुम्ही उद्योग सुरु कराल तेव्हा तुम्हाला तशीच परिस्थिती येईल जेणेकरून तुम्हाला अतिशय कठीण परिश्रम करून, दिवस रात्र मेहनत करून उद्योग सांभाळावा लागेल. जर तुमचा विश्वास असेल कि उद्योग करणे खूप सोपे आहे, मजेशीर आहे तर तुम्हाला तश्याच परिस्थितीला सामोरे जावे लागेल. विश्वास हा कुठे दुकानात भेटत नाही, दुसरा कोणी तुमच्या मनात निर्माण करू शकत नाही. काहींमध्ये तो जन्मजात असतो, काहींना घरातून, नातेवाईक किंवा मित्रांकडून भेटतो व काही स्वतः किंवा परिस्थितीला सामोरे जावून विश्वास निर्माण करतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले स्वप्नाचे आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल करा. निर्णय तुमचा आहे, आयुष्य तुमच आणि जबाबदार पण तुम्हीच.

- अश्विनीकुमार


८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



आपल्यामधील काही गैरसमज दूर करा.

चूक - उद्योजक बनायला खूप मेहनत करावी लागते.
बरोबर - उद्योजक बनणे खूप सोपे आहे. फक्त आवड आणि इच्छाशक्ती लागते. काही एका प्रयत्नातच आणि मेहनत न घेत सुरवातीपासून उत्तम व भरभराटिचा व्यवसाय करतात, काही थोड्या प्रयत्नाने, काही अथक प्रयत्नाने व काही जे बनतच नाही पण प्रयत्न करतच असतात. हे मानसिकतेशी आणि स्वभावाशी संबधित आहे.

चूक - उद्योजक उच्चशिक्षित असतात आणि त्यांनी नावाजलेल्या विद्यापीठामधून पदवी घेतली असते.
बरोबर - उद्योजक शाळेबाहेर प्रत्यक्ष व्यवहारिक अनुभव घेवून तयार होतो.

चूक - गरीब लोक उद्योजक बनू शकत नाही.
बरोबर - उद्योजक बनणे हे संपूर्णपणे मानसिकतेशी निगडीत आहे त्यामुळे कोणीही, जगाच्या पाठीवर कुठेही उद्योजक बनू शकतो.

चूक - फक्त वाममार्गाने मोठा उद्योजक होऊ शकतो.
बरोबर - प्रत्येक माणूस हा आपल्या स्वभावानुसार राहतो व त्यानुसार त्याचा उद्योग चालवतो. आणि दोन्ही प्रकारचे मोठे उद्योजक आपल्याकडे आहेत, मी त्यांच्या नावाचा उल्लेख इथे करणार नाही.

चूक - उद्योजक बनायला १८ वर्षे पूर्ण असावी लागतात.
बरोबर - उद्योजक बनायला वयाची मर्यादा लागत नाही कारण हा संपूर्णपणे मानसिक खेळ आहे. जेवढे कमी वयाचे उद्योजक भारताबाहेर जगात आहेत त्यापेक्षा जास्त त्यांचे प्रमाण भारतात आहे हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष उद्योगाला सुरवात कराल तेव्हा अनुभवास येईल.

चूक - ज्यांनी उद्योग करायचा प्रयत्न केला ते आज भिकेला लागलेत किंवा रस्त्यावर आले आहेत.
बरोबर - अर्धवट अनुभव, केलेल्या चुका परत परत करणे, विरुद्ध दिशेने जाने, अनुभवी किंवा तज्ञ लोकांची मदत न घेणे, ध्येय नसलेल्या नकारात्मक मानसिकता असलेल्या लोकांच्या समूहात वावरणे व भविष्यात चांगले होईल ह्या भ्रमात राहून उद्योग चालू ठेवणे ह्या सध्या गोष्टींमुळे नवीन उद्योजक आपला उद्योग डबघाईला आणतात.

आपले आयुष्य सोपे असते. नकारात्मक विचार ते कठीण बनवतात व सकारात्मक विचार ते सोपे बनवतात आणि इथेच मदत करते ते आत्म विकास. जो स्वतःच्या अंतर्मनामध्ये बदल घडवत जातो तो प्रगतीच्या पथावर असतो. म्हणून प्राचीन काळापासून एक सुविचार आहे "जे आत आहे तेच बाहेर आहे"

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक