यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी उद्योजक
ह्यामध्ये फक्त मानसिकतेचा फरक असतो,
पहिला प्रत्येक अपयशाला हरतो आणि हरण्यामधून
शिकतो परत अपयशाशी दोन हात करून जिंकतो
आणि पुढे त्याच्या कुटुंबांचे आणि सात पिढ्यांचे
आयुष्य आरामदायी करून जातो,
दुसरा पहिल्याच अपयशात हरतो आणि माघार घेतो,
बाकी टप्प्या टप्प्याने हरतात आणि माघार घेतात,
आणि आपल्या कुटुंबांसाठी व पिढ्यांसाठी संघर्ष ठेवून जातात.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक



काही गोष्टी तुम्हाला
बाजारात नाही
भेटू शकत.
आत्मविश्वास
इच्छाशक्ती
एकाग्रता
आशा
स्वप्न
दृष्टी
प्रेम
सुख
आनंद
वेळ
तुम्हाला ते तुमच्या आतच
तयार करावे लागेल.
- अश्विनीकुमार
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक



मी इकडे सामान्य जीवन
जगण्यासाठी नाही आलो.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक

ऑफलाइन उद्योगाच्या संधी


तुम्हाला शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटले असेल कि ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ऑफलाइन उद्योगाच्या संधी कश्या उपलब्ध असतील? ऑनलाइन उद्योगामध्येहि अनेक संधी आहेत त्या मी नाकारत नाही पण काही बड्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यामुळे सगळीकडे ऑनलाइन उद्योगांचा उहापोह केला जातो, हे एक प्रकारे विक्री व्यवस्थापन चे तंत्र आहे जे काही बड्या गुंतवणूकदारांचे पैसे वाचवण्यासाठी वापरले जाते.

एकदा तुम्ही फक्त तुमच्या परिसरात फेरफटका मारायला जा आणि फक्त बघा कि किती उद्योगधंदे चालू आहे ते. तुम्हाला फेरीवाल्यापासून ते पक्क्या दुकानापर्यंत व घरगुती माल बनवणारे ते लघु उद्योगापर्यंत, तुम्हाला अनेक असे उद्योग दिसतील त्यामुळे कोणी टाटा, बिर्ला, अंबानी असला पाहिजे असे नाही किंवा पॉश ठिकाणी काचेचे ऑफिस, कोट, टाय, इंग्रजी बोलणारे, करोडोची उलाढाल करणारे असले पाहिजे असे पण नाही. दृष्टीकोन बदला, जग बदललेले दिसेल.
यश हे कुठच्याहि मापात मोजता येत नाही. एकाने त्याच्या अब्जावधीच्या व्यवसायात करोड रुपये कमावले तो पण फायदा आहे, दुसऱ्याने लाखोंच्या उद्योगात हजार रुपये कमावले तो पण फायदाच आहे आणि तिसऱ्याने हजारांच्या धंद्यात शेकडा कमावला तो पण फायदाच झाला.

नोकरीही काही एका वेळेत लागत नाही, त्यालाही मेहनत करावी लागते. जर तीच मेहनत तुम्ही नोकरीच्या जागी उद्योग सुरु करण्यात केली तर काही महिन्यात तो सेट होईल व नोकर न होता तुम्ही मालक व्हाल. दुसरा पर्याय आहे कि मोठ्या विद्यापीठामधून शिक्षण सुरु असताना मोठ्या कंपन्या तुम्हाला अगोदरच नोकरी देवू करेल आणि जसे तुमचे शिक्षण संपेल तसे तुम्हाला ७ आकडी पगार चालू होईल. आणि जर तुम्ही उद्योग केला तर तो ९ किंवा १० आकडी कमाई करून देईल.
नोकरीही काही एका वेळेत लागत नाही, त्यालाही मेहनत करावी लागते. जर तीच मेहनत तुम्ही नोकरीच्या जागी उद्योग सुरु करण्यात केली तर काही महिन्यात तो सेट होईल व नोकर न होता तुम्ही मालक व्हाल. दुसरा पर्याय आहे कि मोठ्या विद्यापीठामधून शिक्षण सुरु असताना मोठ्या कंपन्या तुम्हाला अगोदरच नोकरी देवू करेल आणि जसे तुमचे शिक्षण संपेल तसे तुम्हाला ७ आकडी पगार चालू होईल. आणि जर तुम्ही उद्योग केला तर तो ९ किंवा १० आकडी कमाई करून देईल.
नोकरी मध्ये आपल्याला एक नियमित उत्पन्न चालू असते तसेच एक नियमित उत्पन्न आपण ज्यांच्याकडे काम करतो तो कंपनीचा मालक त्यालाही चालू असते. नोकरी मध्ये बढती मिळते आणि पगारवाढ होते तसेच कंपनीच्या मालकाची हि बढती होते व त्याच्या उत्पन्नात वाढ होते. नोकरदारांनाहि रोजचे काम रोजच करावे लागते व मालकालाही रोजचे काम रोजच करावे लागते. फरक हा फक्त मानसिकतेचा असतो.

मालकामध्ये नैतृत्व करण्याची क्षमता असते, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असते, चौकटीच्या बाहेर विचार करू शकतो, जबाबदारी उचलतो आणि हे गुण प्रत्येक माणसामध्ये असतात फरक इतका असतो कि कोण कुठच्या गुणांना वाव देतो. काही कठीण नाही आहे हे गुण बाहेर आणणे, जर तुमची इच्छा असेल तरच होऊ शकते नाहीतर कोणी दुसरा तुमची मदत करू शकत नाही.

जे यशस्वी झाले त्यांच्या यशोगाथा ऐकल्यावर प्रोस्ताहित झाल्यासारखे वाटते पण प्रोस्ताहन हे कृतीबरोबर उपयोगी आहे, प्रोस्ताहन हे कृतीविना निरुपयोगी आहे.

विचार आणि कृती मध्ये जमीन आसमान चा फरक आहे. ज्यांना उद्योजक व्हायचे असते ते आज विचार करतात आणि एका महिन्यामध्ये उद्योग चालू करतात, ९० % उद्योजक पहिल्याच अपयशात भीतीने उद्योग बंद करतात व परत पहिल्या गुलामीच्या आयुष्यत जातात त्यानंतर ते सल्ले देताना उद्योग न करण्याचे सल्ले देतात किंवा अतिशय कठीण काम आहे असे सांगतात आणि त्या पलीकडे जावून व्यवसाय करणे हा मराठी लोकांचे काम नाही आहे असे सांगतात. हि त्यांची नकारात्मकता बोलत असते.

उरलेले ८ % भीतीने कसेतरी उद्योगाचा रहाटगाडा ओढत असतात. त्यांचे उद्देश एकच असते कि फायदा नाही झाला तरी चालेल पण नुकसान नको व्हायला. त्यांचे आयुष्य एकसारखेच असते, नवीन, उस्ताही, धाडसी अश्या आयुष्यापासून ते लांबच असतात. २ % जे जन्मजात, परिस्थितीने किंवा मनापासून करतात त्यांना कितीही यश किंवा अपयश आले तरी काही फरक पडत नाही व्यवसाय म्हणजे त्यांच्या स्वभावाचा एक भागच असतो जसे कि ते लहानपणापासून काही न करता फक्त व्यवसाय करत आले आहेत.

काही गोष्टींना आपण तर्क लावू शकत नाही कारण मी विविध प्रकारची, स्वभावाची, परिस्थितून पुढे आलेले उद्योजक बघितले आहे. एक प्रकारे त्यांचे आयुष्य जादूसारखे किंवा आकर्षणाच्या सिद्धान्तासारखे असते. म्हणजे त्यांना कुणाची गरज भासत नाही, ते जे काही करत जातात ते यशस्वी होत जाते किंवा ज्या पण व्यावसायिक सल्लागाराची मदत घेतात तेव्हा पहिल्या सल्ल्यामाध्येच फायदा करायला सुरवात करतात.

हा लेख वाचून आता तुम्हाला थोडी कल्पना आली असेल, आपल्या मेंदूवर ताण द्या, चौकटी बाहेर विचार करा, आपला परिसर फिरा, मागणी आणि पुरवठा बघा, जे जुन्या विचारांनी चालले आहे त्यांना नवीन पद्धतीने कसे करू शकतो हा विचार करा, जुन्या उद्योगाला नवीन तंत्रज्ञानाची जोड कशी देवू शकतो किंवा उत्तम व भविष्यात नफा असलेला उद्योग ओळखून त्या मध्ये गुंतवणूक कशी करू शकतो अश्या अनेक कल्पना तुमच्या मेंदूत येतील त्यापैकी एक कल्पनावर तुम्ही कृती करा कारण कृतीशिवाय अनुभव नाही येत, कृती करा नाही चुकलात तर ठीक पण चुकलात तर त्या चुकांपासून शिका व त्या चुकीची पुनरावृत्ती नका करू, नवीन चुका करा अश्या पद्धतीने तुमचा अनुभव वाढत जाईल व तुम्ही तुमच्या जादूच्या किंवा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार आयुष्य जगायला लागाल.

आता वाचून खूप झाले, कृती करा. काहीही मदत लागल्यास निसंकोच संपर्क करा व आपले अभिप्राय कळवा. धन्यवाद.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक