भारत, उद्योगाच्या संधी आणि जागतिक मंदी


 जागतिक मंदी बोलली कि सगळ्यांना धडकी भरते कारण मागच्या मंदी मध्ये भारताला पण फटका पडला होता ५० हजार पगार पर्यंत कारकुनांचे ठीक होते पण १ लाख च्या पुढे पगार घेणार्यांना नोकरी व पगाराला मुकावे लागले. ते त्यांच्या एका उच्च पद व जीवनशैली वरून नोकरी व पगार गमवून जमिनीवर यायला लागले. तसेच शेअर बाझार कोसळल्यावर झाले होते. लोकांनी आपले कुटुंब संपवले होते.

                भौतिक शास्त्राचा एक नियम आहे कि जो जितक्या वेगाने वरती जाईल तो इतरांपेक्षा कमी वेळेत जास्त उंची गाठेल पण तो तितक्या वेगाने आती उंचावरून खाली येईल. निसर्ग नियम आणि भौतिक शास्त्राचे नियम जगामध्ये सगळ्यांना सारखे आहे. 

                भारता मध्ये लोकांचे बघण्याचे दृष्टीकोन पारंपारिक आणि जुने आहेत पण आताच्या माहिती तंत्रज्ञाच्या युगात पारंपारिक विचार लुप्त व्हायला लागले, जागतिक नागरिकत्व व समानतेचे विचार वाढू लागले. कधी काळी अमेरिका आणि युरोपीय देश यांची उद्योग धंद्यावर मक्तेदारी होती ती आता चीन व भारतासारख्या देशांकडे वळू लागली. अमेरिका व युरोपियन देशांमध्ये लोकसंख्या कमी आहे त्या मुळे तिथे एक जरी उद्योग सुरु झाला कि तो जागतिक दर्जाचा बनतो. वेस्ट मध्ये बरेचशे आंतरराष्ट्रीय उद्योग असे आहेत कि ज्यांचा कच्चा माल भारत चीन व इतर आशियाई देशांमधून कमी किमतीला जातो व वेस्ट मध्ये तयार होवून परत आशिया खंडात महाग विकला जातो.

                भारत व चीन मध्ये लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे अती श्रीमंत, श्रीमंत, उच्च मध्यम वर्गीय, मध्यम वर्गीय, कनिष्ठ मध्यम वर्गीय आणि गरीब (ह्या मध्ये पण मध्यम वर्ग सारखे तीन प्रकार आहेत) आणि प्रत्येक वर्ग आप आपल्या लोकसंख्येप्रमाणे जास्त आहे. इथे तुमची चार आण्याची वस्तू पण विकली जावू शकते ते आगदी ४ करोड ची पण. पाश्चिमात्य देशातील उद्योगाप्रमाणे भारत आणि चीन ला दुसऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर व ग्राहकावर अवलंबून नाही राहावे लागत.

वरील माहिती संशिप्त स्वरुपात तुम्हाला समजण्यासाठी दिली आहे. आता पुढे जावूया. लोक आता जागतिक मंदीच्या भीती मधून बाहेर आले असतील, पण जे काळानुसार न बदलणारे असतात त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कोणी काहीच करू शकत नाही जसे एका उद्योगाचे असते तसेच घराचे पण असते "जसा उद्योगाचा मालक तसा उद्योग, जसा घराचा मालक तसे घर" मालकाची एक चुकी उद्योग कायम बंद करू शकते आणि सर्व कामगारांना रस्त्यावर आणू शकते तसेच घराच्या मालकाची चुकी पूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणू शकते.

  भारतामध्ये मागणी खूप आहे, मागणीच्या मानाने पुरवठा आणि गुणवत्ता कमी आहे कमी आहे. खूप तज्ञ लोक अपुऱ्या मार्गदर्शनामुळे  नोकरी करणे पसंद करतात व धाडस दाखवायचे प्रयत्न करत नाहीत. पाश्चीमात्य देशांमध्ये तज्ञ लोकांना प्रोस्ताहन दिले जाते व शिक्षण व्यवस्था भांडवलदार निर्माण करण्यासारखी आहे.

एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि नोकरी लगेच शिक्षण संपल्यावर भेटत नाही आणि उद्योग लगेच चालू केल्या केल्या भरभराटीला येत नाही. खरे शिक्षण शाळा, विद्यापीठ आणि घराच्या बाहेर असते ना कि शाळेत किंवा घरी. अनुभवला दुसरा पर्याय नाही. असो, निसर्गाचा नियम लक्ष्यात ठेवा "जर तुम्ही बी पेरली तर झाड उगवते" बी कुठेहि पेरा ते झाड बनतेच. ना कष्ट, ना सकारत्मक नकारात्मक नियम, फक्त निसर्ग नियम, तुम्हाला बिल्डिंग च्या भीतीवर पण झाड दिसेल व ते वाढायचे काम करत असेल.
त्याच प्रमाणे तुमच्या मनात येणाऱ्या नवीन कल्पनांचे आहेत. कल्पना एक बी आहे असे समजा आवश्यक त्या गोष्टी हवा, पाणी, सूर्य प्रकाश म्हणजे सकारत्मक विचार, कृती, इच्छाशक्ती ह्या गोष्टी भेटल्या म्हणजे ते कोंब, रोपटे व झाडा पर्यंत चा प्रवास करेन, पण त्या उलटे जर तुम्ही केले तर ते बी निसर्ग नियमानुसार खराब होत जाते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरी पेक्षा उद्योग करणे खूप सोपे आहे.

  भारतात मोठ्या उद्योगांपेक्षा उलाढाल करण्यात सूक्ष्म उद्योगापासून ते मध्यम उद्योगांचे आर्थिक उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात चालते आणि इथे तुम्ही माल बनवणे म्हणजे उत्पादना पासून ते व्यावसायिक सेवा पुरवण्या पर्यंत कशाचा हि उद्योग चालू करू शकता व अंतर्गत बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असल्या मुळे सहसा जागतिक मंदीचा फटका सगळ्या उद्योगांना नाही बसत व मंदी मध्ये हि तुमचा उद्योग नेहमी प्रमाणे चालू शकतो.

तुम्हाला गरज आहे ती बाजार पेठ फिरण्याची, समजून घेण्याची, संधी ओळखायची आणि जर बाजारपेठ मध्ये संशोधन करताना संधी आली तर ती पकडण्याची. मागणी व पुरवठा ह्या मधले अंतर बघा आणि ते भरून काढा, त्यामध्ये पण वेळेचे बंधन असते, काही कायम स्वरूपी असतात तर काही दीर्घ ते लघु कालावधी साठी असतात व काही प्रत्येक वेळेस ठराविक काळातच उपलब्ध असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावनांवर आपला पूर्ण ताबा असला पाहिजे. फायद्यामध्ये आनंद व तोट्या मध्ये दुख ह्या भावना यायला नको, हो पण तरण्याची भावना असलीच पाहिजे.

  हाच नियम सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांवर पण लागू होतो. विशेषज्ञ ची कमरता आहे आणि जे विशेषज्ञ आहेत ते धाडस नाही दाखवत व पारंपारिक नोकरी पत्करतात. माल किंवा वस्तू बनवणे हा एक उद्योगाचा एक भाग झाला आणि त्याची टक्केवारी उद्योगामध्ये फक्त २० टक्के इतकी आहे बाकी ८० टक्के उद्योग हा विक्री, व्यवस्थापन, नियोजन, ग्राहक संपर्क व इतर कार्यालयीन गोष्टी वर अवलंबून असतो. तुम्ही कितीही गुणवत्ता पूर्वक माल किंवा वस्तू बनवा पण जर ती तुम्हाला ग्राहकांना पटवून देत नाही आली तर ती विकली जाणार नाही, एक म्हण आहे "न बोलनऱ्याकडून सोने पण विकले जात नाही, पण बोलनऱ्याकडून पितळ पण सोन्याच्या भावात विकले जाते"

  तसेच व्यवस्थापनाचे आहे. व्यवस्थापन हा संपूर्ण पणे मानसिक आहे. त्यासाठी तज्ञ लोकांना घेतलेले उत्तम असते. तज्ञ मध्ये २ प्रकार असतात एक पदवीधर आणि दुसरा अनुभवी. मी तुम्हाला अनुभवी तज्ञ घेण्याबद्दल सुचवेल. कारण त्यांनी घेतलेले बरे वाईट निर्णय व त्यातून मार्ग काढत जाने ह्यामुळे त्यांची निर्णय क्षमता वाढलेली असते.

भारताचा उद्योग व व्यवसायांची उलाढाल इतक्या कोटी रुपयांची आहे कि तुम्ही त्यामधून वर्षाला १००० कोटी जरी कमविले तरी समुद्रातून एक थेंब काढण्यासारखे आहे आणि ह्या मध्ये मी अजून संपूर्ण जगाची वार्षिक आर्थिक उलाढाल बद्दल उल्लेख नाही केला मग तर १०,००० कोटी पण कमी आहेत. आता हे तुम्हाला ठरवायचे आहे कि तुम्हाला ह्यामधून किती कमवायचे आहे ते. हे तर गुंतवलेल्या पैश्यांची आकडेवारी आहे, जेव्हा तुम्ही उद्योग, व्यवसाय सुरु कराल तेव्हा तुम्ही गुंतलेले पैसे आणि आणि गुंतवणुकीसाठी तयार असलेले पैसे बघून थक्क व्हाल.

चला मग तयार व्हा उद्योगपती बनायला. कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २० वर्षात निवृत्त व्हा व स्वतःचे आयुष्य जगा. समाजसेवा पण करू शकता, पण माझ्या मते उद्योगपती अगोदर पासूनच समाजसेवक असतो कारण त्यःच्या हाताखाली काम करणाऱ्यांचे घर दिलेल्या पगारातून चालू असते हीच सगळ्यात मोठी समाजसेवा झाली. असो आपापले स्वप्न.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक


फेसबुक पेज - https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya
Previous
Next Post »
0 आपले विचार