उद्योजक व सर्वांगीण विकास


शिव खेरा चे प्रसिद्ध वाक्य आहे "उद्योग धंद्यामध्ये काही समस्या नसतात, समस्या असतात त्या माणसामध्ये. त्या माणसामधल्या समस्या दूर करा, उद्योग धंद्यामधल्या समस्या आपोआप दूर होतील."

गाडीच्या चार चाकापैकी एक जरी चाकामध्ये हवा नसेल किंवा कमी असेल तर गाडी चालवायला त्रास होतो तसेच माणसाच्या आयुष्याचे आहे, जर माणसाच्या आयुष्याच्या गाडीच्या एकही चाकामध्ये हवा कमी असेल किवा नसेल तेव्हा त्रासाला सामोरे जावे लागते.

जर तुम्ही मनाने श्रीमंत असाल पण तुमच्याकडे पाहिजे तसे आरोग्य नसेल, पाहिजे तसे पैसे येत नसतील, पाहिजे तसे नातेसंबंध नसतील म्हणजेच जीवनातील बाकींच्या चाकामधली हवा पूर्णपणे निघाली असेल किंवा कमी असेल तेव्हा आयुष्य पाहिजे तसे जगता येत नाही. त्या साठी तुम्हाला स्वतःचे डॉक्टर बनावे लागेल, जो माणूस (स्त्री किंवा पुरुष) स्वतःची समस्या नीट जाणतो तोच निदान करणाऱ्याला नीट सांगू शकतो. त्यासाठी व्यावसायिकाची मदत घेतलेली चांगली कारण त्यांचे हे रोजचे काम असते.


"संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली" लेखक रोबिन शर्मा ह्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे "एक जरी नकारात्मक विचार असेल तरी तुम्ही ऐश आरामाचे जीवन नाही जगू शकत" त्या साठी तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अंगामधील सकारत्मक आणि नकारात्मक गोष्टी लिहून काढावे लागतील आणि तीन भाग करावे लागेल पहिला म्हणजे विचारासंबधी, दुसरा भावनासंबधी आणि तिसरा कृतीसंबधी. धाग्याचा गुंता सोडवणे सोपे आहे, एक जरी टोक पकडले तरी सगळा गुंता सोडवला जातो तसेच माणसाच्या आयुष्याचे आहे, कितीही कठीण प्रसंग किंवा परिस्थिती असो जर त्याचे टोक भेटले कि मार्ग निघून येतो. नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा "आयुष्य सोपे आहे, त्याला कठीण बनवू नका."


जसे आपण लिहित जातो कधी कधी तसेच मार्ग पण सापडत जातात आणि आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. हा पहिला सकारात्मक अनुभव. जर मार्ग स्वतहून सापडत नसेल तेव्हा व्यावसायिकाची मदत घ्या कारण केस कापायला आपण माळ्याकडे नाही जात, न्हाव्याकडेच जातो. असे करता करता आपल्याला आपल्यामधील सुप्त गुण कळत जातात, आपल्या मधील असीम शक्ती उफाळून बाहेर येते, शक्यतांचे प्रमाण वाढत जाते, जे नकारात्मक योगायोग होते ते सकारात्मक होत जातात. नकारात्मक लोक दूर होत जातात व सकारत्मक नवीन लोक जवळ येत जातात आणि तुम्ही आनंद, हर्ष, जल्लोष, प्रेम, निसर्ग अश्या उच्च कंपनांच्या ठिकाणी आकर्षित व्हाल.


दुसरा पर्याय दिवसाची विभागणी खालील प्रमाणे करा 


ध्यान - श्वासावर लक्ष्य केंद्रित करणे, बिंदूवर किंवा एखाद्या वस्तूवर लक्ष्य केंद्रित करणे, मंत्र म्हणजे शब्दांचा समूह (पारंपारिक पद्धतीच्या जागी आपल्याला जशी गरज आहे तसे तयार करणे आणि महत्वाचे ह्यासाठी व्यावसायिकाची मदत घेतलेली चांगली) आपल्यामध्ये ज्या गुणाची कमी आहे त्याचे पुनरुच्चार करणे उदाहणार्थ इच्छाशक्तीची कमी असेल तर "माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे ", "दिवसेंदिवस माझी इच्छाशक्ती वाढत चालली आहे" किंवा "माझा सर्वांगीण विकास होत चालला आहे"
दुसरी महत्वाची सूचना म्हणजे मंत्र हे वर्तमान काळामध्येच असले पाहिजे कारण माणूस जगताना वर्तमानकाळात जगतो, जर चुकून भेटणार आहे आसे भविष्य काळामधला मंत्र जर जप करत राहिलात तर ते तुम्हाला वर्तमानात कधीच भेटणार नाही. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि त्याची आवड निवड पण वेगळी असते किंवा जे तुम्हाला आवडते ते दुसर्याला आवडत नसेल त्यामुळे तुम्हाला हवा तसाच मंत्र बनवा.


प्रार्थना म्हणजे वाक्यांचा समूह तुम्हाला जो तुमच्यात बदल पाहिजे किंवा जे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्याचे वाक्य तयार करा व सगळ्या वाक्यांना मिळवून प्रार्थना तयार करा. जर काही शंका असतील तर मला इ मैल करा.


व्यायाम - व्यायामाचे खूप महत्व आहे. व्यायामामुळे तुमचे शरीराचे कंपन वाढते, आजार कमी होत जातात व निरोगी राहता येते, ताण कमी होतो, इच्छाशक्ती वाढत जाते, एकाग्रता वाढते, शरीर मजबूत होत जाते, चीर तरुण राहता येते, शुक्राणूंची वाढ होते आणि इतर अनेक फायदे आहेत. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये कराटे व किक बॉक्सिंग पण येते आणि खेळ. तुम्हाला ज्याचा छंद आहे तो व्यायम प्रकार निवडा किंवा सगळे प्रकार एकदा करून बघा आणि जो समजण्यास व करण्यास सोपा वाटला तो निवडा. मी आता इथे खालील दोन प्रकारांबद्दल माहिती देतो


• मैदानी व्यायाम - स्ट्रेचिंग (शरीराचे स्नायू मोकळे करणे व शरीर गरम करण्यासाठी), जॉगिंग (मध्यम गतीने धावणे), डबल बार, चीन अप आणि पूल अप, सूर्य नमस्कार किंवा डीप्स, एब्स पाच प्रकार हे सगळे प्रकार येतात जसे आपण कपडे घालताना पूर्ण परिधान करून निघतो तसेच व्यायामाचे आहे, प्रत्येकाचे कमीत कमी दोन सेट मारले तरी पुरेसे आहे. जेव्हा आपण मैदानात व्यायाम करतो तेव्हा आजू बाजूला लक्ष्य विचलित करणाऱ्या खूप गोष्टी असतात त्यामुळे तुम्हाला फक्त व्यायामावर लक्ष्य केंद्रित ठेवावे लागेल. काहीही शंका किंवा मदत लागली असल्यास मला तुम्ही इ मैल आणि whatsapp वर संपर्क साधू शकता.


• व्यायामशाळा - व्यायाम शाळेमध्ये तुम्हाला उपकरणांद्वारे व्यायाम करायला भेटेल पण त्या आगोदर जो कोणी जाणकार असेल त्यांच्याकडून उपकरनांबद्दल माहित करून घ्या कि ती उपकरणे बरोबर आहेत कि नाही कारण एक जरी इंच इकडे तिकडे असेल तर तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते. व्यायाम शाळेची जागा थोडो मोठी आणि हवा खेळती असणारी असावी आणि प्रशिक्षक मित्रासारखा असावा मग व्यायाम करायला खूप मजा येते.


घरी पण व्यायाम करू शकता पण मी असा सल्ला देईल कि बाहेर गेल्यावर नवीन लोकांशी ओळख होते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो व समविचारी मित्र भेटतात.


डायरी - डायरी मध्ये तुम्हाला कसे आयुष्य जगायचे आहे ते आता जगत आहे असे समजून लिहा. उदाहरणार्थ तुम्ही वन रूम किचन मध्ये राहत असाल आणि तुम्हाला तीन रूम किचन विकत घ्यायचे स्वप्न असेल तर ते तुम्ही वर्तमानकाळात लिहून काढा. प्रत्येक जन वेग वेगळे काम धंदे करत असेल म्हणून मी इकडे उदाहरण नाही देत. थोडक्यात म्हणजे तुम्ही तुमचे स्वप्नातले आयुष्य जगत आहात असे लिहित जा.


नोंदवही - नोंद वही खिशात राहील अशी घ्यावी आणि त्यामध्ये रोजची कामे लिहून काढावी, जी पण महत्वाची कामे असतील ती तुम्ही अगोदर करून टाकल त्यामुळे तुमच्या डोक्यावरचा ताण कमी होईल व बाकीच्या कामांकडे निट लक्ष्य केंद्रित होईल.
डायरी किंवा नोंदवही ह्या मध्ये लिहिलेली जर मनाप्रमाणे होत नसेल तर त्यावर प्रतिक्रिया करू नका, आरामात राहा सकारात्मक विचार करा, जे तुमच्या हातात आहे ते बदलण्याचा प्रयत्न करा, ते आज नाही तर उद्या बदलेल, आणि जे आपल्या हातात नाही त्याबद्दल विचार करणे सोडून द्या किंवा आशेवर सोडून द्या. ज्या पण नकारात्मक प्रतिक्रिया तुम्ही देत असाल त्या कमी होत जातील व तुमच्यातील उर्जा वाढत जाईल. तुमचे कार्यालयातले, घरातले व समाजामधले नातेसंबध अधिक मजबूत होत जातील. जिथे अगोदर समस्या दिसत असतील तिथे तुम्हाला समाधान दिसत जाईल. कितीही वर्ष जुन्या समस्या असतील त्या सुटत जातील.


आहार - व्यायामाअगोदर अर्धा एक तास अगोदर केळ खात जा आणी व्यायाम करून घरी आल्यावर कुठच्या प्रकारची शरीर यष्टी पाहिजे त्याप्रमाणे केळ, अंडी किंवा जे पण मोसमी फळ असेल ते खात जा. नाश्ता, दुपारचे जेवण व ताक किंवा दही, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचे रस्त्यवरचे पदार्थ आणि रात्रीचे जेवण असे तुम्हाला जमेल तसे, तुमच्या आवडीप्रमाणे, वेळेप्रमाणे आहार घेत जा. प्रादेशिक आहार उत्तम आहे सीलबंद पदार्थांपेक्षा. आहार तज्ञाची मदत घेतलेली उत्तम राहील. सगळ्यात महत्वाचे शांतपणे आहार घ्या. मनात विचारांचा गोंधळ चालू देवू नका. काही दिवसातच तुमची पचनक्रिया सुधारेल, चेहरा उजळेल आणि तुम्हाला शरीरामध्ये तरतरी जाणवेल आणि बरेचशे आजारपण दूर होतील.


वाचन - वाचनामध्ये मी पहिली पसंदी आत्मविकासाच्या पुस्तकांना देईल. दररोज सकाळी आत्मविकासाची पुस्तक वाचत जा आणि जीवनात वापरात आणायचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला जे बनायचे आहे त्यानुसार आणि तुम्ही जे काम करत असाल त्या वर नवीन सुधारणा असलेली पुस्तके वाचत जा. वाचा आणी प्रयोग करा. ह्यामुळे तुमचा मेंदू पूर्णपणे कार्यरत होईल, परिस्थिती नुसार तुम्ही बदलत जाल, जिथे अगोदर तुम्हाला नुकसान व्हायचे तिथे तुम्हाला फायदा होईल किंवा नुकसानाची तीव्रता कमी होईल. आत्मविश्वास वाढत जाईल. एकसारखे रटाळ जीवन सोडून तुम्ही धोका पत्करून भरारी घ्याल आणि जरी उंचावरून पडले तरी परत अधिक उंचावरून पडण्याच्या तयारीत लागल. शेवटी तुम्ही आकाशाला गवसणी घालायला लागाल. पुस्तक वाचणे हा माझा छंद आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला मनापासून मदत करेन.


टिव्ही वरील बातम्यांचे कार्यक्रम बघणे टाळा, संभाषण सुधारण्यासाठी तुम्ही चर्चा बघू शकता, त्यामध्ये काही जुने दिग्गज पत्रकार आहे जे मुद्देसूद बोलतात त्यांच्याकडून तुम्हाला कसे मुद्देसूद संभाषण करायचे हे शिकू शकता. उद्योगधंद्या संदर्भातले कार्यक्रम तुम्ही बघू शकता, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, शेअर मार्केट संबधी कार्यक्रम, विज्ञान वाहिनी आणि हॉलीवूड सिनेमे इत्यादी आत्मविकासाच्या वाहिनी बघू शकता. हॉलीवूड सिनेमे जास्त बघण्यापेक्षा ऐकायचा प्रयत्न करा कारण त्यामध्ये तत्त्वज्ञान असते, अंध श्रध्धा नसते, जास्तीत जास्त नैसर्गिक नियम वापरले जातात. त्यांचे सुपर हिरो हे उंच उडी मारताना पण भौतिक शास्त्राचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाचे तुम्हाला त्या सिनेमा मधील काही प्रयोगांचा उल्लेख आत्मविकासाच्या पुस्तकात सापडेल. काही सिनेमांचे प्रोस्ताहनपर भागाची मालिका येत्या काळात सुरु करेन.


संभाषण - ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांशी संवाद करताना नेहमी सामान्य विचारांपासून सुरवात कराल, त्या मध्ये त्यांच्या विषयी, कामाविषयी, कुटुंबाबद्दल विचारपूस कराल, जास्त खाजगी विचारपूस नको. आणि कुठेही भावनिक होऊ नका. वादाचे विषय जसे राजकारण आणि धर्म टाळत जा. हसतमुखाने केलेली साधी विचारपूस सुद्धा अनोळखी माणसाला जवळ आणते. आणि जसे आपण माणसे जोडत जातो तसेच आपला उद्योग धंदा भरभराटीला येतो. जिथे मोठ्या कंपन्या जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करतात तिथे तुम्हाला एक रुपया खर्च करायची गरज नाही. एक म्हण कायमची लक्ष्यात ठेवा "बोललेला शब्द परत मागे घेत येत नाही", माणसाच्या किंवा जगाच्या इतिहासाकडे बघितल्यावर तुम्हाला अनुभव येईल. 


आताच्या इंटरनेटच्या युगात ते लगेच पसरले जाते. जे सत्य आहे त्याला पूर्ण जगातून पाठिंबा मिळतो, अगोदर इतकी जलद संभाषणाची साधने नव्हती त्यमुळे जे असत्य आहे तेच जास्ती करून पसरले जायचे व खरे बोलणारी लोक एकटी पडायची, इंटरनेटमुळे सत्याला जगातून पाठींबा मिळतो आणि असत्याला घरातून पण पाठींबा मिळत नाही. आणि लोकांचा माणुसकी वरचा विश्वास वाढत चालला आहे.


बदल हा मानवी गुणधर्म आहे, माणसाचा स्वभाव जन्मजात असतो आणि जर त्याला आहे तसे ठेवून बदल करतो गेलो तर परिणाम सकारात्मक होतात. जशी निसर्गात विविधता आहे तशीच प्रत्येक माणसाच्या स्वभावात पण आहे त्यामुळेच जग सुंदर दिसते. नैसर्गिक गरजा जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाच्या सारख्या असतात, त्या कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आहे तसे परिपूर्ण आहात. मी आपल्या प्रतिसादाची वाट बघतो. धन्यवाद.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार